Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार गटातील २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून ते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2026 | 11:35 AM
सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीवर अमित शाहांचा ताबा?
  • 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
  • राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut: महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान आता आमदारांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आमदारांचे पक्षातील राजकीय घडामोडींमुळे मन उडाले असून ते पक्षाबाहेर पडण्याच्या विचारात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.(Sanjay Raut)

सुनेत्रा पवार गटातील २२ आमदार पक्ष सोडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले असतानाच संजय राऊत यांनी नवा दावा केला आहे. सुनेत्रा पवार गटातील 20 ते 22 आमदार कधीही पक्ष सोडू शकतात. हे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

शरद पवार यांची अलीकडच्या काळात भेट घेणारे नेते केवळ गप्पा मारण्यासाठी येत नाहीत, तर त्यामागे मोठे राजकीय नियोजन सुरू आहे, असा दावा राऊत यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकप्रकारे ताबा मिळवला असल्याचा आरोपही त्यांनी केला. याच कारणामुळे सुनेत्रा पवार गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचे राऊत यांनी सूचित केले.

शरद पवार यांच्या भेटीसाठी आमदारांकडून वेळ मागितल्याची चर्चा

बुधवारी सुनेत्रा पवार गटातील काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र, ही भेट झाली नाही. दुसरीकडे, शरद पवार गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह १५ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यात आयोजित ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यासोबतच ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि महायुतीतील नेत्यांशी होणाऱ्या चर्चांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

गोकुळ दूध संघ अमूलच्या हवाली करण्याचा प्रयत्न? राऊतांचा आरोप

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या सत्तासंघर्षावरूनही संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. गोकुळ दूध संघ गुजरातमधील अमूलच्या हवाली करण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यानंतर कोल्हापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीकडे निवडून आलेल्या सदस्यांमध्ये १३ मतांचे बहुमत होते. असे असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या दबावाखाली चार सदस्यांची नियुक्ती केली आणि सत्तेचे समीकरण बदलले, असा आरोप राऊत यांनी केला. हा प्रकार निवडणूक प्रक्रियेचा भाग नसून सत्तेवर जबरदस्तीने कब्जा करण्यासारखा असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह, मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

डी. वाय. पाटील यांच्या संपत्तीवरून चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

चंद्रकांत पाटील यांनी डी. वाय. पाटील यांच्या संपत्तीबाबत केलेल्या टिप्पणीवरही संजय राऊत यांनी पलटवार केला. डी. वाय. पाटील पूर्वी स्कूटरवर फिरत होते. मात्र, मेहनत आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी जगभरात शैक्षणिक संस्थांचे मोठे साम्राज्य उभे केले, असे राऊत म्हणाले.

एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य पक्षांतर, दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा आणि गोकुळ दूध संघाचा सत्तासंघर्ष या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. संजय राऊत यांच्या २० ते २२ आमदारांबाबतच्या दाव्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे लक्ष लागले आहे.

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार गटातील किती आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा केला आहे?

    Ans: सुनेत्रा पवार गटातील २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

  • Que: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत संजय राऊत यांनी काय आरोप केला?

    Ans: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकप्रकारे ताबा मिळवल्याचा आरोप राऊत यांनी केला.

  • Que: गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावर संजय राऊत यांनी काय आरोप केला?

    Ans: गोकुळ दूध संघ गुजरातमधील अमूलच्या हवाली करण्याचा अमित शाह यांचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊत यांनी केला. तसेच निवडणुकीतील सत्तासमीकरण बदलण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याचेही ते म्हणाले. 

Web Title: Sunetra pawar faction 22 mlas may quit sanjay raut sharad pawar gokul dairy politics sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • sanjay raut
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
1

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक
2

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम
3

Sachin Tendulkar : सचिनच्या बॅट्स सांगणार क्रिकेटमधील सुवर्णकथा; मुंबईत ‘बॅटोग्राफी’ चा अनोखा संगम

राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती
4

राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.