Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhananjay Munde News: राजीनामा देणार का? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

दोन दिवसांपूर्वी  संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.  त्यानंतरही भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत काही गंभीर आरोप केले. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 07, 2025 | 11:39 AM
'मला बदनाम करायचं ते करा,पण...'; पालकमंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा पलटवार

'मला बदनाम करायचं ते करा,पण...'; पालकमंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर धनंजय मुंडेंचा पलटवार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.  अशातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र, धनंजय मुंडेंविरोधात ठोस पुरावे  मिळत नाहीत तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.”महाराष्ट्रातील संवेदनशीलता हरवत चालली आहे. खून होवो, पण त्याचा राजकीय नेत्यांशी काहीही संबंध नाही, असा प्रकार सुरू आहे. एवढं मोठं प्रकरण सुरू असताना आरोप होत आहेत, आणि संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे. मी म्हणत नाही की खून मुंडेंनी केला, पण ज्यांनी केला, त्यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे आहेत.”

HMPV Virus: राज्यात HMPV चा धोका, पुन्हा होम क्वारंटाईन? काय म्हणाले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर?

अजित पवारांसोबतच्या भेटीबाबत आव्हाड म्हणाले, “ही भेट नेमकी कशासाठी झाली? पदभार दोन दिवसांपूर्वीच स्वीकारला होता, मग इतक्या तातडीने खात्याबदलाबाबत काय महत्त्वाचं बोलणं झालं असेल?”  त्याचवेळी अजित पवार यांनी केलेल्या “मतं दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालात का?” या वक्तव्यावरही आव्हाड यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, “माणुसकी हरवलेली नसती तर अजित पवार काल असे बोलले नसते.” अशा शब्दांत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

सुरेश धस यांचे आरोप

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्ह पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.  त्यानंतरही भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेत काही गंभीर आरोप केले.  सुरेश धस म्हणाले, “त्यानंतर 19 जून रोजी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर अवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कराडने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावर वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यावर निवडणुकीसाठी कंपनीकडे लगेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने त्यांना 50 लाख रूपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेकडे देण्यात आले होते. पण वाल्मिक कराडने मात्र आपल्याला हे माहिती नसल्याचे सांगितले.

हिवाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाण्याने अंघोळ करता! मग जाणून घ्या शरीरावर होणारे परिणाम

100 बँक खाती

याचवेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची 100 बँक खाती असल्याचाही दावा केला. तसेच त्याची चौकशी का केली जात नाही. असा सवालही उपस्थित केला. इतर कोणाची 50 बँक खाती असतील तर ईडी लगेच मागे लागले. असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच, वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी यांच्या दोघांकडे मिळून तब्बल 17 मोबाईल नंबर असल्याचा गौप्यस्फोटही केला. वाल्मिक कराड शरण आला पण त्यानंतर नितीन कुलकर्णीही फरार आहे. आता नितीन कुलकर्णींनाही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, असे आवाहन धस यांनी केलं आहे. कुलकर्णीला अटक केल्यानंतर 17 मोबाईल नंबर तपासल्यानंतर कुणी कुणाकडून किती पैसे घेतले हे समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Dhananjay munde spoke clearly about resigning nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Santosh Deshmukh Case
  • Suresh Dhas

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.