राज्यात HMPV चा धोका,पुन्हा होम क्वारंटाईन? काय म्हणाले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर? (फोटो सौजन्य-X)
Maharashtra Health Alert HMPV News Marathi: चीनमध्ये एक नवीन विषाणू वेगाने पसरत आहे. त्याचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) आहे. भारतातदेखील या व विषाणूने एन्ट्री केली असून बेंगलूरु येथील आठ महिन्याच्या बालिकेला या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता राज्यात देखील या विषाणूचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
प्रकाश आबिटकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, याबाबत आपण बैठक बोलावली आहे. हा विषाणू आधीचपासून अस्तित्वात आहे. केवळ चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे चीनने काळजी घेण्यासाठी पावले उचलली आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडून आपल्याला मार्गदर्शनाची माहिती मिळाली आहे. संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आली आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांना योग्य ती माहिती दिली जाते. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
HMPV Virus in Maharashtra: महाराष्ट्रात HMPV विषाणूचा शिरकाव; नागपुरात दोन रूग्णांची नोंद
कोरोनाच्या काळात रुग्णांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच आयसोलेशन वॉर्डही उभारण्यात आले आहेत. कोरोनासारखी तयारी केली जात आहे का? ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने वेळीच सूचना जारी केल्या आहेत. राज्याचा आरोग्य विभागही त्याच पद्धतीने काम करतो. सध्या आयसोलेशनची गरज नाही. लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करावे. आरोग्य विभागाची माहिती आज ना उद्या जाहीर होईल, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नागपुरात सात वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. 3 जानेवारी रोजी रोझीला HMPV ची लागण झाली होती. दोन्ही मुलांमध्ये जुलाब, ताप अशी लक्षणे दिसून आली. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
यामुळेच भारतासह अनेक देश अलर्ट मोडवर आले आहेत. भारत सरकारने म्हटले आहे की ते चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अद्यतने देण्यास सांगितले आहे.
HMPV इन्फेक्शनपासून कोरोनाचे Vaccine वाचवू शकते का? वायरोलॉजिस्टने केला खुलासा