मेसाई गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला (फोटो- istockphoto )
धाराशीव: राज्यात बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेवरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. तर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र हे प्रकरण चर्चेत असतानाच धाराशीव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात देखील अशीच घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील एका गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई गावाच्या जवळच्या एका गावच्या सरपंचावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या गाडीवर पेट्रोल टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मेसाई गागावच्या सरपंचाचे नाव नामदेव निकम असल्याचे समजते आहे. त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. ते या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मध्यरात्री निकम त्यांच्या गाडीतून प्रवास करत होते. सोबत त्यांचा भाऊ देखील होता. त्यावळेस काही गुंडांनी त्यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला केला.
बाईकवरून आलेल्या गुंडांनी दगडाच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंटर गाडीत पेट्रोलचे फुगे टाकले. अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवंत जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे नामदेव निकम यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला कोणत्या कारणासाठी करण्यात आला हे मात्र अजून समोर आलेले नाही. मात्र हा हल्ला म्हणजे बीडची पुनरावृत्ती होती का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: “…तर मी काही करू शकत नाही”; CM फडणवीसांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचे विधान
संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा
बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आहेत. राज्यामध्ये सध्या बीड हत्या व परभणी हिंसाचार प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. राज्यातील या गुन्हेगारींच्या घटनेवर नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. वाल्मिकी कराड हा मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दरम्यान आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.