संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण संपूर्ण राज्यभर चर्चेत आहेत. राज्यामध्ये सध्या बीड हत्या व परभणी हिंसाचार प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. राज्यातील या गुन्हेगारींच्या घटनेवर नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. वाल्मिकी कराड हा मुंडे यांच्या जवळचा व्यक्ती असल्याने मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. दरम्यान आज धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी होती. संतोष देशमुख प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत. या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी व्हावी या मतांचा आहे. मला आणि माझ्या विरोधात बोलल्याशिवाय एखाद्याचा दिवस सुरू होत नसेल तर त्याला मी काही करू शकत नाही. माझ्या जवळचा कोणीही असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे”, असे मुंडे म्हणाले.
संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा
बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट: मुख्यमंत्री फडणीसांची सभागृहात मोठी घोषणा
फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर वॉचमॅननं सरपंट संतोष देशमुखांना दिली.
वॉचमॅनकडून माहिती मिळताच सरपंचआणि काही जण त्याठिकाणी पोहटले. आपल्या माणसांना दुसऱ्या गावातील काही लोक मारहाण करत असल्याचे पाहून त्यांनी मारेकरऱ्यांना हूसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यातच मारामारी झाली.9 डिसेंबरला संतोष देशमुख देशमुख गावी परत जाण्यासाठी निघाले होते. ते एकटेच असताना वाटेत त्यांनी आतेभाऊ भेटले आणि त्यांना सोबत घेऊन निघाले.