Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : लाखोंचा खर्च करुनही 108 रुग्णवाहिका सेवा ठप्पच ! प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा तीव्र संताप

रुग्णांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले असून, यापूर्वी उघडकीस आलेल्या त्रुटींमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 05:36 PM
Dharashiv News : लाखोंचा खर्च करुनही 108 रुग्णवाहिका सेवा ठप्पच ! प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा तीव्र संताप
Follow Us
Follow Us:

 

  • लाखोंचा खर्च करुनही 108 रुग्णवाहिका सेवा ठप्पच !
  • प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा तीव्र संताप
धाराशिव/शीतलकुमार शिंदे : रुग्णांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा धाराशिव जिल्ह्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे वास्तव समोर आले असून, यापूर्वी उघडकीस आलेल्या त्रुटींमध्ये अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. उलट ही सेवा निगरगट्टपणा, मुजोरी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अधिकच बेफिकीर बनल्याची तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून एका ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस 108 क्रमांकाची रुग्णवाहिका उभीच असल्याचे आढळून आले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या कालावधीत संबंधित रुग्णवाहिकेने एकाही रुग्णाला सेवा दिलेली नाही. आपत्कालीन सेवेसाठी सज्ज असलेली ही रुग्णवाहिका प्रत्यक्षात ‘शोपीस’ ठरत असल्याचा आरोप होत आहे.

या रुग्णवाहिकेवर एक वैद्यकीय अधिकारी, एक चालक आणि एक सहायक अशी तिघांची नियुक्ती असून, त्यांच्या वेतनासाठी शासन दरमहा लाखो रुपयांचा खर्च करते. याशिवाय इंधन, देखभाल, औषधसाठा आणि अत्यावश्यक उपकरणांसाठीही मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. म्हणजेच एका रुग्णवाहिकेमागे दरमहा मोठा खर्च होऊनही प्रत्यक्ष सेवा मात्र शून्य असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात एकूण 15 रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जाते; मात्र या सेवेचा लाभ रुग्णांना वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. 108 वर फोन केल्यास कॉल उचलला जात नाही, आणि उचलला तरी रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. अनेक वेळा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते तेव्हा रुग्णाला आधीच खासगी वाहनाने हलविण्यात आलेले असते.

Weather Update: नागरिकांनो सावधान! २२ ते २५ एप्रिल दरम्यान ‘या’ जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’; प्रशासन सतर्क

या विलंबामुळे रुग्णांच्या जीवावर बेतणाऱ्या घटना घडत असून, नागरिकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे शासनाकडून रुग्णवाहिकांवर लाखोंचा खर्च होत असताना, दुसरीकडे रुग्णांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने ‘दुहेरी आर्थिक फटका’ बसत आहे.या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित यंत्रणेला वठणीवर आणावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.दरम्यान, “रुग्णवाहिका सेवा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी आहे की केवळ यंत्रणा जिवंत ठेवण्यासाठी?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.

Exclusive Series : लिंग समभावाचा वैयक्तिक प्रवास जेव्हा संपूर्ण गावालाच बदलवतो… कोण आहेत ‘दीपक शिंदे’?

 

Web Title: Despite spending lakhs 108 ambulance service remains suspended citizens express anger over administrations negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Dharashiv Crime
  • Dharashiv News
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.