धाराशिवच्या परांडा तालुक्यात कंडारी–सोनारी रस्त्यावर अपघाताचा बनाव करून 35 वर्षीय मोतीराम जाधव यांचा खून केल्याचा उघडकीस आला आहे. जुन्या वादातून दोन मित्रांनी जड वस्तूने डोक्यात वार केल्याचा आरोप आहे.
धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या तारा तोडताना विजेचा धक्का लागून 25 वर्षीय दत्ता वाघमारेचा मृत्यू झाला. मोबदल्याच्या वादातून शेतकऱ्याने मजुरीवर बोलावून धोकादायक काम करवले. बहिणीच्या तक्रारीवर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.
धाराशिवमध्ये कला केंद्रातील नर्तिकेसोबत प्रेमसंबंधातील वादामुळे 25 वर्षीय अश्रुबा कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघे देवदर्शनावरून परतताना वाद झाला होता. पोलिस तपास सुरू असून महिला ताब्यात.
पैसे न दिल्यास पीडितेला मारहाण करत होता. कामाबाबत साधी विचारणा केली तरी शिवीगाळ, अपमान करत होता. पीडितेच्या सासू व दीर राहुल मोरे यांनीही घरगुती किरकोळ कारणांवरून तिला शिवीगाळ करून अपमानित…
तुळजापूर तालुक्याच्या जळकोट येथील सुभद्रा रामशेट्टी पाटील या महिलेचा तीच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता. तीच्या अंगावरील तब्बल चार लाख किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाकेर सौदागर यांच्यासह २४ जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आदर्श आचारसंहिता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तुळजापूर तालुक्यातील केशेगावात तरुणाने कुऱ्हाडीने हल्ला करून सिद्धाराम दहिटणे यांची भर चौकात निर्घृण हत्या केली. आरोपी निखिल कांबळे पोलिसांच्या ताब्यात असून वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज.
धाराशिव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची घटना समोर आली आहे. कला केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्याबेकायदेशीर प्रकरणांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात आली आहे.
धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून पती- पत्नीची भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी गाडीला धडक दिली. नंतर पती पत्नी खाली पडताच कोयत्याने वार…
हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
धाराशिवमध्ये रक्षकच भक्षक बनल्याचे समोर आले आहे. धाराशीव येथील एका पोलीस निरीक्षकाने पिस्तुलाचा धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
धाराशिव: जिल्ह्यातील येणेगूर येथील एका शाळेतील २९ विध्यार्थ्यांना अचानक पोटदुखी, मळमळ, उलटीचा त्रास. या विध्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा समोर आला आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यात सर्वाधिक मुली आहेत.
दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ९५ हजार रुपये स्वीकारतांना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.