Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागरिकांच्या जीवाशी खेळ! धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा कळस, ब्लॉक फुटपाथच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार

धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा झाल्याची माहिती मिळत आहे.सिमेंट काँक्रीट व डांबरी रस्त्यांसह पूल व पेव्हर ब्लॉक फुटपाथच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 16, 2026 | 06:20 PM
धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा कळस, ब्लॉक फुटपाथच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार (फोटो सौजन्य-Gemini)

धाराशिव सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराचा कळस, ब्लॉक फुटपाथच्या नावाखाली कोट्यवधींचा अपहार (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Close
Follow Us:

धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : धाराशिव शहरासह ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) मार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते, डांबरी रस्ते, पूल, गटारी व पेव्हर ब्लॉकचे फुटपाथ या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अनियमितता व दर्जाहीन कामे सुरू असल्याचे गंभीर आरोप लोकांतून होत आहेत. शासनाच्या कोट्यावधींच्या निधीचा वापर जनतेच्या सोयीसाठी न होता, अधिकारी व ठेकेदारांच्या खिशात जात असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून करण्यात येत आहे. या कथित गैरप्रकारांमध्ये अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांच्यासह संबंधित ठेकेदारांचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून, नियम, तांत्रिक मानके व कायदे सर्रास धाब्यावर बसवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अक्षरशः थट्टा

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिमेंट काँक्रीट रस्त्यांना ठरावीक जाडी, दर्जेदार सिमेंट, योग्य प्रमाणातील खडी-वाळू व आवश्यक क्युरिंग बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी जाडी कमी ठेवून, निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याचे आरोप आहेत. काही रस्ते अवघ्या काही आठवड्यातच तडे जाणे, खचणे व उखडणे सुरू झाले असून, ही कामे कागदोपत्री मात्र दर्जेदार दाखवण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”

पूल व गटारींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

ग्रामीण भागातील लहान-मोठ्या पुलांच्या व गटारींची कामांमध्ये दर्जाहीन सिमेंट, निकृष्ट खडी व अपुरे लोखंडी सळ्या वापरल्याचे आरोप असून, यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यात पूल कोसळण्याचा धोका असतानाही संबंधित अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पेव्हर ब्लॉक फुटपाथ : पैसे खाण्याचा नवा फंडा

शहरातील वर्दळीच्या भागात बसवण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक फुटपाथमध्ये पायाभूत काम न करता, निकृष्ट दर्जाचे ब्लॉक्स टाकण्यात आल्याने काही महिन्यांतच ब्लॉक्स बसणे, उखडणे व फुटणे सुरू झाले आहे. नागरिक चालताना घसरून पडण्याच्या घटना घडत असून अपघातांचा धोका वाढला आहे.

मोजमाप पुस्तिका (एमबी) व बिलांमध्ये संशय

या सर्व कामांबाबत मोजमाप पुस्तिका (मेजरमेन्ट बुक), दर्जा चाचणी अहवाल व देयकांमध्ये गंभीर तफावत असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात काम अपूर्ण किंवा निकृष्ट असतानाही पूर्ण झाल्याचे दाखवून कोट्यवधींची बिले अदा करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही बाब महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली, आर्थिक शिस्त व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा स्पष्ट भंग असल्याचे जाणकारांचे मत आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ; करदात्यांच्या पैशाचा चुराडा

निकृष्ट रस्ते, धोकादायक पूल व उखडलेले फुटपाथ यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत. अपघात, वाहनांचे नुकसान व वेळेचा अपव्यय होत असून, करदात्यांच्या मेहनतीच्या पैशाचा अक्षरशः चुराडा केला जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी, स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक ऑडिट, सर्व संशयित कामांची गुणवत्ता तपासणी, संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन व दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिक व विविध संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात येत आहे.

BMC Election Result 2026: दक्षिण मुंबईत लोढांचा ‘मलबार हिल’ गड अभेद्य! पाचही वॉर्डात कमळ फुललं; मनसे आणि ‘उबाठा’चा धुव्वा

 

Web Title: Peak of corruption in dharashiv public works department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त
1

Dharashiv Crime : व्याजाने रक्कम देणाऱ्या मित्राच्या घरी चोरी; तीन मित्र गजाआड, ७९,७८०चा मुद्देमाल जप्त

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त
2

Solapur Municipal Elections : 102 जागांसाठी 564 उमेदवार रिंगणात; मतदान केंद्र परिसरात पोलिसांचा मोेठा बंदोबस्त

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
3

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
4

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.