Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: जिप अध्यक्षपदासाठी पाटील-सावंत यांची प्रतिष्ठेची लढत, अर्चना पाटील की सावंत गटाचा उमेदवार?

धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन मातब्बर नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करत आपलाच अध्यक्ष व्हावा या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 12, 2026 | 04:47 PM
जिप अध्यक्षपदासाठी पाटील-सावंत यांची प्रतिष्ठेची लढत, अर्चना पाटील की सावंत गटाचा उमेदवार? (फोटो सौजन्य-Gemini)

जिप अध्यक्षपदासाठी पाटील-सावंत यांची प्रतिष्ठेची लढत, अर्चना पाटील की सावंत गटाचा उमेदवार? (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

शीतलकुमार शिंदे । धाराशिव : धाराशिवच्या मिनी मंत्रालयाचा कारभारी अर्थात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शुक्रवारी १३ मार्चला ठरणार असून जिल्ह्यातील महायुतीचे दोन मातब्बर नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करत आपलाच अध्यक्ष व्हावा या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी आमदार पाटलांच्या अर्धांगिनी जिपच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील की, आमदार सावंतांच्या मर्जीतील अन्य कुणी अध्यक्ष होणार यावर जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.

जिल्हा परिषदेत भाजपाकडे १९ इतके संख्याबळ असून महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीचे ६ आणि ४ अपक्ष मिळून २९ इतके संख्याबळ आहे. शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपाच्या बाजूने असल्याचा भाजपाचा प्रबळ दावा असून या ३१ सदस्यांच्या बळावर आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचा भाजपाचा दावा आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे (शिंदे) १५ सदस्य असून शिवसेना अभेद्य असल्याचा दावा करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने (शिंदे) चक्क उबाठा आणि काँग्रेसला सोबत घेत सत्ता स्थापनेसाठी मजबूत मोर्चे बांधणी केली असल्याचा दावा केला आहे. उबाठाचे ७, काँग्रेसचे ३ आणि समाजवादी पार्टीच्या एकमेव सदस्यासह ४ अपक्षही आपल्या सोबत असून, अशा प्रकारे सत्ता स्थापनेसाठी आवश्यक मॅजिक फिगर आपल्याकडेच असल्याचा दावा सेनेकडून सातत्याने केला जात आहे.

Alandi Temple News: आळंदीचा ‘कायापालट’ होणार? खासदार मेधा कुलकर्णींची संसदेत मोठी मागणी

दरम्यान, भाजपाच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चना पाटील, उपाध्यक्षपदी शिवसेना (शिंदे) तर बांधकाम सभापतिपदी राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांना विराजमान करण्यात येणार असून चार अपक्ष सध्या भाजपासोबत आहेत. शिवसेनेचे आमदार सावंत यांच्यासोबत ते चार अपक्ष सल्याचा दावा फोल असल्याचा दावा करण्यात या भाजपाच्या स्थानिक सूत्रांनी केला आहे. तसेच शिवसेनाप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थानिक पातळीवरही उबाठा आणि काँग्रेससोबत शिवसेनेची युती कदापी मान्य होणारी नसून आमदार सावंतांचे आडाखे फोल ठरणारे असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, या बाबत उबाठा आणि काँग्रेसकडून कसल्याही प्रकारच्या स्पष्ट किंवा धूसर आशा हालचाली दिसत नसून उबाठाचे आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील नेतेही या बाबत गप्प असल्याचे चित्र आहे. एकंदरीत भाजपाकडे मॅजिक फिगरच्या संख्याबळासह यंत्रणा सज्ज असल्याचे दिसत असून निवडून आलेल्या क्षणापासून भाजपाने प्रायोजित केलेल्या सहलीवर हे सर्व ३१ सदस्य गेलेले आहेत.

याबाबत शिवसेनेचे (शिंदे) जिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांना या घडामोडी विषयी विचारणा केली असता, त्यांनी गुरुवारी रात्री शिवसेनाप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला निर्णय सांगतील, त्याप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी करू. असे त्यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख शिंदे हे उबाठा किंवा काँग्रेस सोबत जाण्यास तयार होतील का या प्रश्नावर, त्यांनी अनधिकृतपणे सांगायचे झाले तर, साहेब असे कांही सांगणार नाहीत. मात्र साहेब जो निर्णय घेतील, तो आम्हला मान्य असेल. आम्ही त्याची अंमलबजावणी करू. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाची सगळी तयारी झालेली असून उद्या भाजपाचा सदस्य जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान होईल. सोबत असलेल्या राष्ट्रवादीसह (अजित पवार) सर्वांशी सगळी बोलणी झालेली आहेत. उपाध्यक्ष आणि अन्य विषय समित्याही कोणाकडे असतील याचे चित्रही उद्याच स्पष्ट होईल, अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली.

Haj House Kharghar: हज यात्रेकरूंसाठी गुड न्यूज! नवी मुंबईत मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण

Web Title: Prestige battle of patil savant for the position of dharashiv zp president archana patil or savant group candidate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी
1

University News: धाराशिव विद्यापीठ उपकेंद्र सक्षम करण्याची मागणी; प्र-कुलगुरूंना निवेदन, ‘वन विंडो’ सेवेसह विविध सुविधांची मागणी

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती
2

शासनाच्या दिनदर्शिकेला हरताळ? धाराशिवमध्ये 26 ऐवजी 25 जूनलाच साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
3

Dharashiv News : सुरक्षा रक्षकांच्या वेतनावर डल्ला? शासकीय कार्यालयांतील कंत्राटी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक
4

Satara News: लिंब ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.