Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Fire News: दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

Dharashiv Fire News: धाराशिव तालुक्यातील येडशी येथे सोमवारी पहाटे भीषण आग लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलींसह आई-वडील आणि आजी-आजोबांचा समावेश आहे. किराणा दुकानाला लागलेल्या आगीने लगतच्या घरालाही कवेत घेतल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 09, 2026 | 11:22 AM
दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

दोन चिमुकल्यांसह तीन पिढ्या संपल्या! किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लगतचे घरही जळून खाक

Follow Us
Follow Us:
  • येडशीत मध्यरात्री काळाचा घाला!
  • भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू
  • आई-वडील, आजी-आजोबा आणि दोन मुलींचा आगीत दुर्दैवी अंत
Dharashiv Fire News: धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे सोमवारी पहाटे घडलेल्या भीषण अग्नितांडवामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. किराणा दुकानाला लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करत लगतच्या घरालाही आपल्या कवेत घेतले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या घटनेत दोन अल्पवयीन मुलींसह तीन पिढ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे.

पहाटे अडीचच्या सुमारास आगीचा भडका

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास येडशी येथील ‘करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर’ या दुकानाला अचानक आग लागली. सुरुवातीला दुकानापुरती मर्यादित असलेली आग काही वेळातच मोठ्या प्रमाणात पसरली. दुकानाला लागून असलेल्या घरालाही आगीने वेढल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

Fire Incidents: “लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव…

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.

दोन अल्पवयीन मुलींसह सहा जणांचा मृत्यू

या भीषण आगीत उत्तम त्रिंबक करंडे (वय ७५), चंद्रकला उत्तम करंडे (वय ७०), गोविंद उत्तम करंडे (वय ४७), ज्योती गोविंद करंडे (वय ४२), गायत्री गोविंद करंडे (वय १६) आणि सिद्धी गोविंद करंडे (वय १५) यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आजी-आजोबा, त्यांचा मुलगा-सून आणि दोन नाती यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे येडशी गावासह संपूर्ण धाराशिव परिसरात शोककळा पसरली असून, तीन पिढ्यांचा एकाच दुर्घटनेत झालेला अंत मन हेलावून टाकणारा ठरला आहे.

येडशी येथील या दुर्घटनेमुळे अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः दुकानाला लागूनच घर असल्यास आग प्रतिबंधक उपाययोजना, विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांची उपलब्धता किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने अधोरेखित केले आहे.

Family Harassment: “पती-सासऱ्यांच्या शारीरिक-मानसिक त्रासाने घेतला बळी! ५ दिवसांच्या संघर्षानंतर शेवटी…

💡

Frequently Asked Questions

  • Que: येडशी येथे आगीची दुर्घटना कुठे घडली?

    Ans: धाराशिव तालुक्यातील येडशी येथे 'करंडे किराणा स्टोअर्स अँड गिफ्ट वेअर' या दुकानाला लागून असलेल्या घरात ही दुर्घटना घडली.

  • Que: येडशी येथील आगीत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.

  • Que: येडशी येथे आग कशामुळे लागली?

    Ans: आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे आग लागली का, याचा तपास सुरू आहे.

Web Title: Yedshi fire six members of same family die in dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Dharashiv
  • Fire
  • maharashtra

संबंधित बातम्या

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम
1

Firecracker Burn First Aid: दिवाळीत फटाक्यांमुळे हात भाजला आहे? घाबरून न जाता ‘हे’ घरगुती उपाय केल्यास तातडीने मिळेल आराम

My Village Healthy Village Campaign : खटाव पंचायत समिती येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
2

My Village Healthy Village Campaign : खटाव पंचायत समिती येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Gondiya News: दुष्काळी अग्रीम, पीएम किसानचा २४ वा हप्ता व कर्जमुक्तीचे वितरण; शेतकऱ्यांना १११ कोटींचा आधार
3

Gondiya News: दुष्काळी अग्रीम, पीएम किसानचा २४ वा हप्ता व कर्जमुक्तीचे वितरण; शेतकऱ्यांना १११ कोटींचा आधार

Vijay Wadettiwar: धाराशिवमध्ये ४०० जणांच्या बेकायदेशीर भरतीचे रॅकेट? सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप
4

Vijay Wadettiwar: धाराशिवमध्ये ४०० जणांच्या बेकायदेशीर भरतीचे रॅकेट? सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.