मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (यूट्यूब)
पुण्यात धडाडली मुख्यमंत्र्यांची तोफ
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचार सभा
15 तारखेला मतदान तर 16 ला निकाल जाहीर होणार
पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर होते. राज्यात महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे. 15 तारखेला मतदान होणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. पुणे महानगरपालिकेत भाजप- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. आज कात्रज येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
पुण्यातील प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे शहराचा विचार केला तर हे शहर देशातील सर्वात वेगवान विकास होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीएचा वेगाने विकास होत आहे. पुणे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून आपण पाहतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात पुणे एक वेगाने विकास होणारे शहर म्हणून पुढे येत आहे.”
LIVE | पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ 'विजय संकल्प सभा' 🕗 रा. ८.०५ वा. | ५-१-२०२६📍पुणे.@BJP4Maharashtra#Maharashtra #Pune #पुणे_महानगरपालिका https://t.co/gR2HRYeZMx — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2026
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुणे मेट्रोच्या घोषणा झाल्या , पण काम होत नव्हते. त्यानंतर आम्ही ठाम निर्णय घेत मेट्रोचे कामे सुरू केले. आज पुण्यात 110 किलोमीटरचे नेटवर्कचे काम करतोय. 33 किलोमीटर पूर्ण झाले आहे. 24 किलोमीटर टप्प्यात आहे. यामुळे दळणवळण सोपे होणार आहे.”
“पुण्यात जवळपास 3 हजार कोटींच्या पिण्याच्या पाण्याच्या विकासकामे सुरू केली. शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क निर्माण करतोय. यामध्ये एआयचा वापर करून पुण्याला सुरक्षित करण्याचे काम करणार आहोत. आज जरी या ठिकाणी पाणी पित असलो तर निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.






