Dhule News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत धुळे जिल्ह्यातील 3,258 शेतकऱ्यांना 33 कोटी 1 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालजाहीर होणार आहेत. दरम्यान महायुतीचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला.
धुळे साक्री तालुक्यात कांदा भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने तीन मुलींचा अपघात झाला. त्यापैकी एकीला ग्रामस्थांनी वाचवले, तर दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. गावात शोककळा पसरली.
कपडे वाळविताना अचानक निर्मलाला विजेचा जबर धक्का बसला. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून गाढ झोपेत असलेला लोकेश क्षणाचाही विलंब न करता आईला वाचवण्यासाठी धावला. लोकेशने आईला जिवंत तारेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला.
दीपोत्सवाच्या १० दिवसांचा काळ एसटी महामंडळासाठी बंपर कमाईचा काळ ठरला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील एसटीच्या चौघा आगारांना अक्षरशः सोन्याची पर्वणी लाभली आहे.
काँग्रेसच्या दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून, धुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद घटल्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रेमातून अनेक वेळा चुकीच्या घटना घडलेल्या ऐकू येतात आता पुन्हा एकदा धुळ्यातील शिरपूर गाव अशा घटनेने हादरून गेले आहे. प्रेमप्रकरणातून एका तरूणाची हत्या करण्यात आली असून नाल्यात फेकले गेले
धुळेमधील एका कार्यक्रमामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
हन याने वेळोवेळी खंडणी स्वरूपात २ लाख रुपये घेतले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवत त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून 20 लाखाची मागणी केली.
पेनाचं टोपण गिळल्यामुळे पहिलीत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिसरात शोक व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात चांदीच्या विटा जप्त केल्या आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात कोट्यवधींची मौल्यवान रत्ने जप्त करण्यात आली आहे.