Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Taluka Elections: पुरंदर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापला; चारही गटांत थेट लढती

पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारींमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 29, 2026 | 01:51 PM
Purandar Taluka Elections: पुरंदर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापला; चारही गटांत थेट लढती

Purandar Taluka Elections: पुरंदर पंचायत निवडणुकीचा रणसंग्राम तापला; चारही गटांत थेट लढती

Follow Us
Close
Follow Us:
  • जिल्हा परिषदचे ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार
  • जिल्हा परिषद मतदारसंघांतून  २१ उमेदवारांनी अर्ज माघारी
  • पंचायत समितीसाठी दाखल अजपैिकी ५१ उमेदवारांनी माघार
 

Purandar Taluka Elections: पंचायत पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम चांगलाच तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील माघारींमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. चारही जिल्हा परिषद गटांमध्ये थेट लढती निश्चित झाल्या असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा परिषद व पुरंदर तालुका पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून, मंगळवारी अर्ज माधारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद मतदारसंघांतून तब्बल २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी १७ पक्षीय आणि २ अपक्ष असे एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उरले आहेत. पंचायत समिती निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्या असून, दाखल अजपैिकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. परिणामी आता ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती जाणार आहे.

हेही वाचा: छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

दिवे-गराडे गट या गटात माघारीनंतर आता तीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून दिव्या संदीप जगदाळे, शिवसेनेकडून ज्योती राजाराम झेंडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रुपाली अमोल झेंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. बेलसर माळशिरस गट या गटात पाच उमेदवारांनी माधार घेतली असून सहा उमेदवार मैदानात आहेत. भाजपचे अजय कैलास इंगळे, शिवसेनेचे रमेश रामचंद्र इंगळे, शिवसेना (उबाठा) चे अमोल दत्तात्रय कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव विजयराव कोलते, आम आदमी पक्षाचे शहाजी रत्नाकर कोलते आणि काँग्रेसचे दत्तात्रय मारुती झुरंगे यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्कराज संजय जाधव, शिवसेनेचे समिर अरविंद जाधव, काँग्रेसचे नवनाथ चंद्रकांत माळवे, भाजपचे हरिभाऊ कुंडलिक लोळे, तसेच अपक्ष म्हणून अनिल लक्ष्मण धिवार आणि हेमंतकुमार भाऊसाहेब माहूरकर निवडणूक लढवत आहेत. निरा-कोळविहीरे गट या गटात सहा उमेदवारानी माधार घेतल्यानंतर चार उमेदवार शिल्लक राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, भाजपच्या सीमा संदीप धायगुडे, काँग्रेसच्या सविता राजेंद्र बरकडे आणि शिवसेनेच्या भारती अनुल म्हस्के यांच्यात सामना रंगणार आहे.

हेही वाचा: Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड

एकूणच पुरंदर तालुक्यातील चार जिल्हा परिषद जागांसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली असून, प्रचाराला आता वेग आला आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, त्यामुळे पुरंदरचे राजकारण आणखी तापणार हे निश्चित आहे. ६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली होती. २२ जानेवारी रोजी अर्जाची छाननी झाल्यानंतर तब्बल पाच दिवस अर्ज माघारीसाठी उपलब्ध झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या रणनीती राबवत मोठ्या प्रमाणावर माधारी घडवून आणल्या.

Web Title: Direct fights set in zilla parishad seats after massive candidate withdrawals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Purandar
  • Zilla Parishad Election 2026

संबंधित बातम्या

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र
1

Dharashiv Zilla Parishad: धाराशिवमध्ये शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालथ; उमेदवारी माघारीने बदलले निवडणुकीचे चित्र

Sangali News: निवडणुकीपूर्वी  बड्या नेत्याच्या घरासमोर करणी- जादुटोण्याचा प्रकार;  पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट 
2

Sangali News: निवडणुकीपूर्वी  बड्या नेत्याच्या घरासमोर करणी- जादुटोण्याचा प्रकार;  पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट 

पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला
3

पुरंदरमधील रस्त्यांवर गतिरोधकांची गरज; सायकल स्पर्धेनंतर वाहनांचा वेग वाढला

Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने
4

Purandar Politics: पुरंदरमध्ये महायुतीत पुन्हा संघर्षाची ठिणगी; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.