Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Disha Salian Case : मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?, वडिलांची हायकोर्टात याचिका

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 19, 2025 | 09:42 PM
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?,  वडिलांची हायकोर्टात याचिका

मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?,  वडिलांची हायकोर्टात याचिका

Follow Us
Follow Us:

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला, असा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव जोडलं जात होतं. त्यांची चौकशी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात सातत्याने आवाज उठवला होता. आदित्य ठाकरेंचं नाव या प्रकरणाशी जोडलेलं होतं. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी दिशाच्या वडिलांनी केली आहे. मात्र दिशाच्या वडिलांनी यापूर्वी या प्रकरणी आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हटलं होतं. परंतु आता अचानक मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान दिशाच्या वडिलांची या प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी नजरकैदेत ठेवलं. तपासादरम्यानचे पुरावे खरे मानण्यात भाग पाडलं गेलं आणि मुंबई पोलिसांनी दबाव टाकल्याचा आरोप, त्यांनी केला आहे.

मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा या प्रकरणावर भाष्य केलं आहे., मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय. दिशा सालियनचा खून झाला होता. आदित्य ठाकरेंचं ८ जूनचं मोबाईल लोकेशन तपासा, तिथल्या वॉचमनचं काय झालं? हे मी विचारत होतो. आज तिच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आमच्यावर खोटारडेपणाचा आरोप करणारे आता काय बोलणार? आता तर थेट तिच्या वडिलांनीच गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.

कोण आहे दिशा सालियन?

दिशा सालियन मुंबईत एका कंपनीत टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करत होती. 8 जून 2020 रोजी तिचा मृत्यू झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा खाली पडली होती.या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यानंतर दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.

Web Title: Disha salian fathers petition in mumbai high court demands dip investigation likily aditya thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Nitesh Rane
  • sushant singh rajput

संबंधित बातम्या

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार
1

Mumbai News : मुंबईतील 14 फुटांवरील झोपड्यांवर कारवाईचा मुद्दा तापला; ठाकरे गटाचा विरोध, भाजपचा पलटवार

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर
2

Maharashtra Drought : जालन्यात दुष्काळाचा मच्छीमारांना मोठा फटका; सोमठाणा तलावात मत्स्यउत्पादन २० टक्क्यांवर

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं
3

‘त्यादिवशी राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी..,’ राऊतांच्या आरोपांवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर, सिंधुदुर्गच्या जमिनीवरून राजकारण तापलं

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा
4

Sushant Singh Rajput Case: ‘पाय तुटला, डोळ्यांना इजा अन्…’; पोस्टमॉर्टमबाबत श्वेता सिंह कीर्तींचा नवा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.