Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा; रणजित बोठे पाटील यांचा सुजय विखे पाटलांना खोचक टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या भाषणानंतर रणजित बोठे पाटील यांनी टीका केली आहे. एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा, असं रणजित बोठे पाटील यांनी म्हटलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2024 | 03:37 PM
एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा; रणजित बोठे पाटील यांचा सुजय विखे पाटलांना खोचक टोला

एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा; रणजित बोठे पाटील यांचा सुजय विखे पाटलांना खोचक टोला

Follow Us
Close
Follow Us:

माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी एका भाषणात म्हटलं होतं की, जिल्ह्याचा विकास करू, पण आपल्या शिर्डी मतदारसंघातच शेकडो प्रश्न रोज उभे राहत आहेत. त्यावर काम करण्याची गरज आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना खोचक टोला लगावला आहे. शरद पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजित बोठे पाटील म्हणाले की, आता आपण माजी खासदार आहोत याचे भान ठेऊन मोठ्या वल्गना कराव्यात. एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा.

हेदेखील वाचा- उरण द्रोणागिरी सेक्टर 51 देव कृपा चौकात हिट अँण्ड रनचा थरार; नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर

पुढे बोलताना रणजित बोठे म्हणाले की, निळवंडे चाऱ्यांचे आणि पाण्याचे प्रश्न, अनेक तलाव भरले गेले नाहीत, रस्त्याची अवस्था न विचारलेली बरी, नगर – मनमाड रस्ता जणू काही तीन पिढ्यांची देणं आहे, अशी समस्यांची जत्रा आधीच आपल्याकडे आहे. दुसऱ्यांची गाडी ओढायला जाताना मात्र आपल्या गाडीचे चाके गळून पडली आहेत, हे हि पाहणे तितकेच गरजेचे आहे. पावसाची अनियमितता असल्याने पाट पाण्याचे नियोजन सुजय विखे पाटलांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असून देखील कोलमडले आहे. आजू बाजूचे मतदारसंघ पाहून आपल्या मतदारसंघाची मात्र आता चिंता वाटू लागली आहे. मतदार संघातील वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न आजही कायम आहेत.

एकदा आपले धड करा मग बाहेरचे सुधारायला जा, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजीत बोटे पाटील यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या पत्रकात त्यांनी विखेंच्या मतदारसंघातील वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांचा आलेख वाचला आहे.

हेदेखील वाचा-राज ठाकरे उद्या बदलापूरकरांच्या भेटीला येणार; बदलापूरमधील घटनेबाबत नागरिकांशी संवाद साधणार 

रणजित बोठे पाटील म्हणाले की, विखे परिवारामध्ये तीन पिढ्यांची सत्ता असून देखील विखे पाटील कुटुंबाने शिर्डी मतदारसंघात दैनंदिन प्रश्न देखील आजवर सोडवले नाहीत. वीज, पाणी, रस्ते, रोजगार हे साधे शेतकरी व तरुणांचे मूलभूत प्रश्न जर इतके वर्ष निकाली निघाले नसतील तर हे खूप दुःखद आहे. निवडणूका आल्या की या प्रश्नांची सोडवणूक आम्ही कशी करणार याचे मोठे मोठे आश्वासने देण्याचे काम आजवर केले गेले. मात्र प्रश्न आहे तेच पुनः पुनः प्रत्येक निवडणूकित उपस्थित होतात.

अहमदनगर जिल्ह्यात काय विकास करायचा ते करायला जिल्ह्यातले मोठे नेते सक्षम आहेत. आपण सध्या निदान राहता त्या परिसरात आणि शिर्डी परिसरात असणाऱ्या समस्या डोळे उघडुन बघाव्यात. अनेक गावांना बस उपलब्ध नाहीत, वर्दळीचे रस्ते धडाचे नाहीत त्यामुळे विद्यार्थी पालकांचे हाल होतात. फक्त भाषण बाजी करून विकास होणार नाही त्यासाठी जनतेचे प्रश्न आपण एवढे वर्ष का सोडवले नाही याचे चिंतन विखे पाटलांनी करावे, अशी टीका रणजित बोठे पाटील यांनी केली आहे.

Web Title: District general secretary of ncp sharad pawar party ranjit bothe patil criticism to former mp sujay vikhe patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • Sujay Vikhe-Patil

संबंधित बातम्या

शिवसेना उबाठा नेत्यांना लग्नाचे निमंत्रण नसते त्यामुळेच अजितदादांवर टीका, विखेंचा टोला
1

शिवसेना उबाठा नेत्यांना लग्नाचे निमंत्रण नसते त्यामुळेच अजितदादांवर टीका, विखेंचा टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.