Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘योग्य पद्धतीने काम केलं नाही तर…’; खासदार धैर्यशील मोहितेंनी अधिकाऱ्यांना भरला दम

सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेकाप कार्यकर्त्यांनी भाषणात सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल, असा इशारा दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2024 | 03:11 PM
'योग्य पद्धतीने काम केलं नाही तर...'; खासदार धैर्यशील मोहितेंनी अधिकाऱ्यांना भरला दम

'योग्य पद्धतीने काम केलं नाही तर...'; खासदार धैर्यशील मोहितेंनी अधिकाऱ्यांना भरला दम

Follow Us
Follow Us:

अकलुज : गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल, असा दमच माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना दम भरला.

सांगोला तालुक्यातील महूद येथे शेकापच्या मेळाव्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांचे जेसीबीने फुले उधळत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे नेते आणि सांगोला विधानसभेसाठी इच्छुक असणारे डॉ. बाबासाहेब देशमुख यांची व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची जोरदार मिरवणूक काढण्यात आली. यावेळी खासदार मोहिते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरापासून सांगोल्यातील पोलीस आणि महसूल अधिकारी हे राजकीय दबावापोटी एकतर्फी कामकाज करत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने कामे केल्यास थेट खुर्चीत जाऊन जाब विचारला जाईल’.

दरम्यान, जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. जर आमचा संयम सुटला तर सोलापूर जिल्ह्यातील जनता काय आहे हे त्यांना कळेल, अशा शब्दांत धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरला.

सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या बाजूने पोलीस आणि महसूल अधिकारी एकतर्फी कामे करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. शेकाप कार्यकर्त्यांनी भाषणात सांगताच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगोल्यातच बापूंच्या प्रेमातील अधिकाऱ्यांना सज्जड दम भरत राजकीय द्वेषाने कामे केल्यास आमचा संयम सुटेल, असा इशारा दिला. यावेळी ‘नको झाडी डोंगर, नको शिमला गुवाहटी, आमच्या गणपतराव आबांचे सांगोलाच भारी’ अशा जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी महुद परिसर दणाणून सोडला होता.

Web Title: Do the right thing says dhairyasheel patil nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2024 | 03:11 PM

Topics:  

  • Dhairyasheel Patil
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं
2

Accident News: तीन महिन्यांपूर्वी बोहल्यावर चढला, पण संसार थाटण्याआधीच काळाने हिरावलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.