मुंबई : डॉ. सुधीर तांबेंचं (Sudhir Tambe) काँग्रेसमधून (Congress) निलंबन करण्यात आलाय. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्यानं कारवाई करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित. डॉ. सुधीर तांबे हे सत्यजित तांबेचे (Satyajeet Tambe) वडील आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन हायकमांडनं सुधीर तांबेंना निलंबित केलं आहे.