Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dr. Tara Bhawalkar : ‘माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर आपण किती…’; PM मोदींचं नाव न घेता तारा भवाळकर यांची टीका

आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 21, 2025 | 09:49 PM
'माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर आपण किती...'; PM मोदींचं नाव न घेता तारा भवाळकर यांची टीका

'माझा जन्म जैविक नाही म्हणणाऱ्यांवर आपण किती...'; PM मोदींचं नाव न घेता तारा भवाळकर यांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्लीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात डॉ. भवाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं होतं. तुम्ही थकत का नाहीत? असा प्रश्न मोदींना विचारण्यात आला होता. त्यावर मोदी म्हणाले, “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविक नाही. मला ईश्वराने त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी पाठवलं आहे.” मोदींच्या या विधानानंतर त्यांना बरीच टीकाही सहन करावी लागली होती.

संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, शिवला तर विटाळ होतो आणि दुसरा स्त्रीचा. निसर्ग धर्माने दिलेली मासिक पाळी तिची! त्यालाही विटाळच म्हणायचं. आता ही बाई कुठल्याही शाळा, कॉलेजात गेली नाही, कुठल्याही स्त्री मुक्तीवालीकडे गेली नाही, तिला कुठली ‘सिमोन दी बोव्हा’ माहिती नव्हती. ती काय म्हणते ? ‘देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुध्द तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही.

आता आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे. परंतु, त्याचा भंडाफोड या आमच्या संत कवयित्रींनी १३ आणि १४ व्या शतकातमध्ये केला आहे. ज्यावेळेला लिपी आणि लिहिण्यावाचण्याला त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं. स्त्री मुक्तीच्या उद्गात्या आणि झेंडा फडकवणाऱ्या म्हणायचं की नाही? म्हणजे आजच्या स्त्री मुक्तीच्या विचारांना मागे सारतील अशाप्रकारचे विचार आमच्या या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी निरनिराळया जातीजमातीच्या स्त्रियांनी त्यांच्या साहित्यातून मांडल्या आहेत. त्या जातीच्या स्त्रिया ज्यावेळेला बोलतात त्यावेळेस त्यांची विचारशक्ती, प्रतिभाशक्ती आणि संवेदनशीलता, भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व या सगळ्या किती मोठ्या गोष्टी आहेत असेही संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या.

प्रतिभा ही महिलांमध्ये उपजत निर्मितीच्या दृष्टीने ज्याला आपण कला म्हणत असतो ती कला म्हणजे दुसरं काय असतं ? संवेदनशीलता नेमक्या शब्दात उतरवणं, याच्यासाठी जी प्रतिभा लागते, ती प्रतिभा या बायकांच्याजवळ उपजत आहे. आणि ती अनुभवातून परिपक्व झालेली आहे. ह्यांच्याकडे आम्ही या सबंध इतिहासाच्या प्रवाहामध्ये लक्ष देणार आहोत की नाही ? असा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आपण लक्ष न देता पुढे चाललेले आहोत आणि आम्ही सुधारलेले आहोत असं आपण म्हणत असतो, अशा शब्दात संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी खंत व्यक्त केली.

Web Title: Dr tara bhawalkar criticizes pm narendra modi in 98th marathi sahitya sammelan on he was not biological

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • PM Narendra Modi
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब
2

Ram Mandir Dharmadhwaj Rohan :राम मंदिराच्या कळसावर फडकणार धर्मध्वज; PM मोदींचा अयोध्या दौरा असणाऱ्या ‘या’ खास बाब

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी
3

Tasgaon Politics : तासगावमध्ये राजकीय भूकंप; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील दोन नेत्यांची बंडखोरी

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
4

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.