Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांसाठी महत्त्वपूर्ण बातमी! दिवाळीमुळे ‘या’ वेळेत राहणार मेट्रो सेवा बंद

पुणे मेट्रोने रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे. दिवाळीच्या निमित्त पुणे मेट्रो काही काळ बंद राहणार आहे. याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2024 | 02:06 PM
pune metro closed on 1st november

pune metro closed on 1st november

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : देशभरामध्ये दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. दिवाळीनिमित्त अनेक सोयी सुविधांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो सेवेबाबत देखील बदल करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणार असाल तर ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. दिवाळीच्या निमित्त पुण्यातील मेट्रो सेवेमध्ये बदल करण्यात आला आहे.

पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून दिवाळीबाबत मेट्रो सेवा बंद असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे मेट्रोने बुधवारी आपल्या प्रवाशांसाठी सोशल मीडियावर एक महत्त्वाचे अपडेट शेअर केले. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनामुळे सांयकाळच्या वेळेमध्ये मेट्रो बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गावरील (पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी) मेट्रो सेवा संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

हे देखील वाचा : पंजाब सरकारकडून दिवाळीचे बंपर गिफ्ट; कर्मचारी अन् पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ

लक्ष्मीपूजनामुळे मेट्रो सेवा संध्याकाळपासून बंद राहणार आहे.  शनिवारपासून, मेट्रो सेवा सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत पुन्हा सुरू होईल. यापूर्वी पुणे मेट्रोने दिवाळीमुळे मोठी गर्दी झाली होती. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मेट्रो सेवेचा मोठा वापर केला. त्यामुळे मेट्रोचे उत्पन्न देखील चांगले वाढले.

#AttentionPlease
कृपया लक्ष द्या !!
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० दरम्यान मेट्रोची सेवा बंद… pic.twitter.com/vHHQVWzQbV — Pune Metro Rail (@metrorailpune) October 30, 2024

हे देखील वाचा : “विमानतळाचा प्रश्न प्रलंबित ठेवून कागदाचे विमान…”; शिवतारेंची आमदार जगतापांवर जोरदार टीकास्त्र

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि भारतीय जनता युवा मोर्चा (बीजेवायएम) महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोला रात्री 11 वाजेपर्यंत वेळ वाढवण्याची विनंती केली होती. मात्र पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, मेट्रो सेवेच्या वेळेत लवकरच वाढ होण्याची शक्यता नाही. या क्षणी वेळ वाढवणे कठीण आहे. आम्हाला रात्री गाड्या आणि इतर पायाभूत सुविधांची प्रतिबंधात्मक देखभाल करावी लागते, असे मत मांडले होते. त्यानंतर आता दिवाळीमुळे पुणे मेट्रो सायंकाळी बंद राहणार आहे.

Web Title: Due to diwali lakshmi puja pune metro will be closed on 1 november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 12:30 PM

Topics:  

  • Diwali 2024
  • Pune
  • Pune Metro

संबंधित बातम्या

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार
1

पुणे महामेट्रोकडून प्रवाशांसाठी ऑनलाईन ‘लॉस्ट अँड फाउंड’ सुविधा सुरू; मेट्रो स्टेशनवर विसरलेली वस्तू ऑनलाईन पाहता येणार

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
2

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
3

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
4

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.