खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच झापले, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे : रेल्वेच्या कामकाजातील बेफिकिरी, लोकप्रतिनिधींशी संपर्क टाळण्याची सवय आणि कामांबाबतची गोपनीयता यामुळे संतप्त झालेल्या खासदारांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पुण्यात भर बैठकीत झोडपलं. पुणे व सोलापूर विभागातील खासदारांची सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरील डीआरएम कार्यालयात झालेली बैठक वादळी ठरली. यावेळी विशेषतः खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्यासमोरच अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत सुनावलं.
बैठकीत उपस्थित खासदारांनी रेल्वेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांचा पाणउतारा केला. मतदारसंघात काम सुरू आहे की नाही, हे लोकप्रतिनिधींना कळत नाही. कारण अधिकारी माहिती द्यायलाच तयार नाहीत. कामाचे निरीक्षण करायला कोणी येत नाही. हे सगळं अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत खासदार सुळे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. बैठकीदरम्यान महाव्यवस्थापक मीना अचानक खुर्चीवरून उठले, त्यावर खासदार सुळे यांनी त्यांनाच थेट झापलं. त्यानंतर मीना यांना सारवासारव करावी लागली. अधिकारी मात्र नेहमीप्रमाणे “पाहतो, बघतो” अशा भूमिकेऐवजी गप्प राहणंच पसंत करत असल्याचं चित्र होतं.
बैठकीत उपस्थित खासदार
सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, ओमप्रकाश निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. अमोल कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे, निलेश लंके, विशाल पाटील, रजनी पाटील, नितीन जाधव-पाटील, शिवाजी काळगे, माया नारोलिया, मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
खासदारांचा रोष का?