Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 17, 2026 | 05:38 PM
काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार; आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार
  • आमदार निलेश राणे यांची शेतकऱ्यांना ग्वाही
  • शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव हा चिंतेचा विषय
मालवण : सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी सध्या उत्पादन खर्च, अस्थिर बाजारभाव आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर न्याय मिळावा या उद्देशाने शेतकरी प्रतिनिधींनी पुढाकार घेत कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. यावेळी निलेश राणे यांनी सर्व माहिती ऐकून घेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिली.

 

बैठकीत काजू उत्पादनातील वाढत्या अडचणी, बाजारातील अस्थिर दर, उत्पादन खर्चात झालेली वाढ, वन्यप्राण्यांकडून होणारा उपद्रव तसेच स्थानिक व आयात काजूतील दरातील तफावत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या सर्व प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडावी, अशी आग्रही मागणी शेतकरी प्रतिनिधींनी निलेश राणे यांच्याकडे केली. या बैठकीमुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांना नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शासन पातळीवर योग्य निर्णय झाल्यास सिंधुदुर्गातील काजू उत्पादकांना दिलासा मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

गोवा राज्यात काजूसाठी मिळणाऱ्या दराचा मुद्दा अधोरेखित

सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई आणि संघाचे खजिनदार आकाश नरसुले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या मांडताना सखोल व अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काजूची आवक, सध्याचे बाजारभाव, स्थानिक उत्पादन व आयात काजूची प्रतवारी याबाबतची आकडेवारीही यावेळी आमदारांना देण्यात आली. विशेषतः लगतच्या गोवा राज्यात काजूसाठी मिळणाऱ्या दराचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला.

हे सुद्धा वाचा : सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव हा चिंतेचा विषय

गोव्यातील दरांच्या तुलनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मिळणारा कमी भाव हा चिंतेचा विषय असल्याचे प्रतिनिधींनी नमूद केले. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत असून, शासनाने योग्य दर धोरण आखण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार निलेश राणे यांनी सर्व माहिती गांभीर्याने ऐकून घेत येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Mla nilesh rane has made a big promise to the farmers who planted cashew nuts in sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • nilesh rane

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं
1

Maharashtra Politics: सस्पेन्स संपला! शरद पवारांचा पक्ष एनडीएमध्ये येणार की नाही? देवेंद्र फडणवीसांनी थेट सांगूनच टाकलं

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक
2

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी
3

‘मिसिंग लिंक’च्या निकृष्ट कामावरून रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल, राम मंदिर घोटाळ्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.