Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्साहात साजरी; भजन, कीर्तनाने दुमदुमला राजगुरुनगरचा भीमातीर

राजगुरुनगर येथील भीमानदीतीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार (दि. ६) ते गुरुवार (दि. ८) पर्यंत श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 09, 2022 | 02:51 PM
धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्साहात साजरी; भजन, कीर्तनाने दुमदुमला राजगुरुनगरचा भीमातीर
Follow Us
Close
Follow Us:

राजगुरूनगर : राजगुरुनगर येथील भीमानदीतीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार (दि. ६) ते गुरुवार (दि. ८) पर्यंत श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या निमित्त मंगळवार (दि. ६) रोजी सकाळी ८ वाजता आभिषेक व महापूजा यजमान नथुराम तनपुरे यांच्या हस्ते करुन उत्सवास सुरुवात झाली. सकाळी १० वाजता गायत्री महायज्ञ, सायंकाळी ५ वाजता प्रेमध्वजाची मिरवणूक काढून समीर आहेर, अविनाश नाणेकर, जेष्ठ गुरुबंधू पांडुरंग साळुंके, रविकाका जोशी, सुहास कुलकर्णी, प्रभाकर जाधव, बाबासाहेब साळुंके व गुरुबंधू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ७) सकाळी श्रींना अभिषेक व महापूजा यजमान समीर आहेर यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच ‘ओम नमः शिवाय’चा अखंड मंत्र जागर करण्यात आला. दुपारी २ वाजता श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सायंकाळी ५ वाजता दत्त जन्मावर हभप तान्हाजी बाबर यांचे प्रवचन होऊन श्रींचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तदनंतर आरती करून सुंठवडा वाटप करण्यात आले. रात्रौ १० वाजेपर्यंत गुरुबंधुच्या उपस्थितीत श्रींची मिरवणूक काढून ग्रामप्रदक्षिणा संपन्न झाली. व रात्री उशीरापर्यंत जागर व संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडला.

प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता

गुरुवारी (दि. ८) रोजी दुपारी ३ वाजता श्री दत्त विश्वस्त मंडळाचे भजन व सामुदायिक मंत्रजप होवून सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होऊन विशाल रामचंद्र घुमटकर यांच्या हस्ते प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता करण्यात आली.

उत्सवासाठी यांनी घेतले परिश्रम

कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष समीर आहेर, कार्याध्यक्ष रविंद्र जोशी, उपाध्यक्ष बाबासाहेब साळुंके, सचिव नथुराम तनपुरे, खजिनदार हनुमंत सैद, प्रकाश तेंडोलकर, प्रभाकर जाधव, पांडुरंग साळुंके, अविनाश नाणेकर, माणिक तनपुरे यांनी केले होते. तर नारायण जाधव, भीमाशंकर तारू, प्रवीण शेट्ये, ऍड. गणेश होनराव, मंदार पिसाळ, शरद चोपडे, कमल पिसाळ, कुसुम तनपुरे, जनाबाई सैद, महादेव पाटील आणि त्यांचे सहकारी आदी गुरू बंधूं- भगिनींच्या सहकार्याने उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.

Web Title: Dutt jayanti was celebrated with enthusiasm by religious events bhimatir of rajgurunagar to dumdumla with bhajan kirtana nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • Rajgurunagar

संबंधित बातम्या

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण
1

Navarashtra Special: पुण्यातून भुंग्याच्या नव्या प्रजातीचा शोध; ‘आकुर्डी’ असे नामकरण

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश
2

Pune Mhada News: “म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना…”; अजित पवारांचे निर्देश

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय
3

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! वीज दर सवलतीला मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचे 4 महत्त्वाचे निर्णय

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?
4

राजगुरुनगर बँकेच्या वार्षिक सभेला गालबोट, दोन सभासदांत हाणामारी; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.