राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा झाला आहे. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दक्षणा फाउंडेशनमधील जेईई आणि नीट परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या परराज्यातील सुमारे ८० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना (दि. २० रोजी ) घडली आहे. खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
महिनाभरात आरक्षणावर निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सोडले होते. पण आता पुन्हा त्यांनी इशारा दिला आहे.
आता सोमवारपासून ग्रामीण भागातील नागरिकांना दैनिक आणि मासिक पास उपलब्ध होणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीतील पास देखील सुरु राहणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली आहे.
निसर्गचक्राच्या उतरत्या किमयेमुळे कोथिंबीरीच्या बाजारभावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, सद्यपरिस्थितीत प्रती जुडी चा भाव केवळ १ ते १.५० रुपयांवर आल्यामुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे चित्र खेड तालुक्यात दिसून येत आहे.
राजगुरुनगर येथील भीमानदीतीरी श्री दत्त विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मंगळवार (दि. ६) ते गुरुवार (दि. ८) पर्यंत श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात विविध…
छत्रपती शिव शंभू सोशल फाऊंडेशन दावडीच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत ओंकार तिकांडे याने प्रथम क्रमांक पटकावला. सहभागी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवशंभू सोशल फाउंडेशनच्या वतीने…
कार्तिकी वारी २०२२ निमित्त आळंदी परिसरात इंद्रायणी घाट, महात्मा गांधी स्मारक, भक्त पुंडलिक मंदिर व सिद्धेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छतेचा, प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन जनजागृती करण्यात…
जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाईट येथील १९ कोटी ७९ लाख रुपये खर्चाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सरपंच मंगल भांगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदींच्या हस्ते करण्यात आले.
हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लब व खेड तहसील यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदान जनजागृती सायकल राईडचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लब मधील ३० ते ३५ सदस्यांनी सहभाग नोंदवला.
जाणीव जागृती मंच अंतर्गत क्रांतिसिंह राजगुरू बुद्धिबळ ( चेस ) अकॅडमीच्यावतीने प्रथमच शहरात आयोजित बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात उमेश तर १७ वर्षांखालील गटात सोहम गोरडे, १४ वर्षांखालील गटात प्रथम…
उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी बँक समजल्या जाणाऱ्या राजगुरुनगर बँकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड सहकारी संस्था सहायक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे आणि त्यातून होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या संतापाचा अखेर उद्रेक झाला.
प्रभाकर जाधव (प्रतिनीधी) : राजगुरूनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, या ठिकाणी मोठी व्यावसायिक बाजारपेठ आहे. येथे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, वीजवितरण कंपनी, भारतीय आयुर्विमा मंडळ, पोलीस…