Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व कायम; निवडणूक एकतर्फी जिंकण्यात पवार यशस्वी

गट क्रमांक पाच सोनगावमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सिताराम काटे यांना 11 हजार 789 मते मिळाली आहेत. तर बाळासाहेब कोळेकर यांना 11768 मते मिळाले आहेत. तर संतोष मासाळ यांना 10,307 मते मिळाली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 20, 2025 | 12:54 PM
श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व कायम

श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व कायम

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं. अखेर पुन्हा एकदा या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनेलचे 21 पैकी 21 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. संघर्षमय झालेल्या या लढतीमध्ये श्री जय भवानी माता पॅनलने श्री छत्रपती बचाव पॅनलचा सुपडासाफ केला आहे.

कोणाला किती मते?

गट क्रमांक एक लासुर्णेमधून श्री जय भवानी माता पॅनेलचे पृथ्वीराज जाचक यांना 11694 मते मिळाली आहेत. तर शरद जामदार 10529 मते मिळाली आहेत. तर श्री छत्रपती बचाव पॅनलचे संजय निंबाळकर यांना 4850 तर प्रताप पवार यांना 4197 मते मिळाली आहेत. गट क्रमांक दोन सणसरमध्ये श्री जय भवानी माता पॅनेलचे रामचंद्र निंबाळकर यांना 10929 मते मिळाली. तर शिवाजी निंबाळकर यांना 10431 मते मिळाली. विरोधी संग्राम निंबाळकर यांना 5165 मते मिळाली. तर महादेव शिरसाट यांना 3957 मते मिळाली.

तर उद्धट गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार पृथ्वीराज श्रीनिवास घोलप यांना 9672 मते मिळाली. तर गणपत सोपान कदम यांना 9297 मते मिळाली. तर या गटात मात्र घोलप यांना मोठा फटका बसला आहे. इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे श्री छत्रपती बचाव पॅनलमधून मैदानात होते. त्यांना 6961 मते मिळाली आहेत. तर भाजपचे नेते तानाजीराव थोरात यांना 4721 मते मिळाली आहेत.

यात सोबत अंथुर्णे गटामधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार प्रशांत दासा दराडे यांना 11180 मते मिळाली आहेत. तर अजित नरुटे यांना 11 हजार 90 मते मिळाली आहेत. विरोधी पॅनलचे श्री छत्रपती बचावमधून मैदानात असलेले बाबासाहेब झगडे यांना 4940 मते तर राजेंद्र पाटील यांना 4860 मते मिळाली आहेत.

अनिल सिताराम काटे यांना 11789 मते

गट क्रमांक पाच सोनगावमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार अनिल सिताराम काटे यांना 11 हजार 789 मते मिळाली आहेत. तर बाळासाहेब कोळेकर यांना 11768 मते मिळाले आहेत. तर संतोष मासाळ यांना 10,307 मते मिळाली आहेत. याच गटात विरोधी असलेले श्री छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार रवींद्र टकले यांना 5482 मते मिळाली आहेत. तर गुणवडी गटामध्ये श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार कैलास गावडे यांना 11832 मते मिळाली. तर निलेश टिळेकर यांना 11,563 मते आणि सतीश देवकाते यांना 11,261 मते मिळाले आहेत तर विरोधी असणारे नितीन काटे यांना 5434 मते मिळाले आहेत.

तानाजी शिंदे यांना मिळाली 11358 मते

इतर मागास प्रवर्गमधून उभे असलेले श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार तानाजी शिंदे यांना 11358 मते मिळाली तर विरोधी असलेले संदीप बनकर यांना 5166 मते मिळाली. भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार योगेश पाटील यांना 11843 मते मिळाली. तर योगेश पाटील यांना पाठिंबा दिलेले उमेदवार तुकाराम काळे यांना 4172 मते मिळाली. अनुसूचित जाती जमातीमधून श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार मंथन कांबळे यांना 11511 मते मिळाली तर विरोधी असणारे बाळासाहेब कांबळे यांना 4961 मते पडली असून, ब वर्गातून अशोक संभाजी पाटील यांना 260 मध्ये तर त्यांना पाठिंबा दिलेले सत्यजित भाऊसाहेब सपकळ यांना 16 मध्ये मिळाली आहेत.

Web Title: Dy cm ajit pawar undisputed dominance continues in the shri chhatrapati karkhana elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक
1

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
2

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
3

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा
4

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.