
, Maharashtra Politics, Mahayuti, Shiv Sena, NCP
माणगाव येथे राष्ट्रवादीच्या नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी तटकरेंना लक्ष्य केले, ‘येत्या काही दिवसांत रायगडमधील राष्ट्रवादीची ब्याद राष्ट्रवादीतून बाहेर पडणार आहे. सुनील तटकरे बाहेर पडले तरी त्यांना शिवसेनेत घेऊ नका,’ असा सल्लाच त्यांनी मंत्री भरत गोगावले यांना दिला. ‘तटकरेंचा राजकारणात यापुढे जन्म होणार नाही.
राज्याच्या रातेसाठी एकत्र आलेल्या महायुतीतील घटक पक्षांचे नेतेच परस्परांवर आरोपांच्या फैरी झाडत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अंतर्गत संघर्षांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. महायुतीची एकजूट केवळ सतेपुरतीच उरली आहे कर असा प्राप्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आयु ष्यात आपल्याला काय मिळेल यासाठीच ते काम करतात,” अशा शब्दांत दळवींनी हल्लाबोल केला, गोगावलेंनी गिजर बदलला नाही, तर आम्ही गिअर बदलू, असा इशाराही त्यांनी दिला.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून दळवी, गोगावले आणि शिंदेसेनेच्या अन्य नेत्यांनी यापूर्वीही तटकरेंना अनेकदा लक्ष्य केले आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दळवींच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. माणगावमधील माजी नगरसेवक संदीप खरगटे, दिलीप जाधव, जयंत बोरडे, रत्नाकर उभारे, भाग्यश्री यादव आणि माजी उपनगराध्यक्ष निलिमा मेहता यांच्यासह शेकडो कार्यकत्यांनी शिदिसेनेत प्रवेश केला. हा मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Devendra Fadnavis Chhath Pooja : जुहू चौपाटीवर छठपूजेचा जनसागर! ‘एक समुद्र पाण्याचा,
दुसरीकडे, विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने भाजप आणि शिंदेसेनेतील स्थानिक राजकीय समीकरणावरूनही मतभेद समोर आले, कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघषांत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र चंगेकर यांच्यातील वादंगानेही युतीतील कुरबुरींना तोंड फोडले, त्यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्येच एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.
Ans: रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पद आणि स्थानिक राजकीय वर्चस्वावरून शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील नेत्यांमध्ये मतभेद तीव्र झाले आहेत.
Ans: माणगाव येथील कार्यक्रमात बोलताना महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका करत म्हटले की, ते केवळ स्वतःच्या फायद्यासाठी काम करतात आणि ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले तरी त्यांना शिवसेनेत घेऊ नये.
Ans: रायगडच्या राजकारणात आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत "गोगावलेंनी गिअर बदलला नाही, तर आम्ही गिअर बदलू," असा सूचक इशारा महेंद्र दळवी यांनी दिला आहे.