Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

परराज्यातील अनेक तरुण ज्यांची काहीच माहिती उपलब्ध नाही. ते गावोगावी फिरून खारी, टोस्ट, बिस्किटे, पाव अशा विविध बेकरी पदार्थांची घरोघरी विक्री करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात चिंताजनक चित्र दिसून येत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 08:28 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

शशिकांत पवार। अहिल्यानगर: अहिल्यानगर तालुक्यातील ग्रामीण भागात परराज्यातील काही तरुण गावोगावी फिरून खारी, टोस्ट, बिस्किटे, पाव आदी बेकरी पदार्थांची घरोघरी विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या उत्पादनांबाबत तसेच विक्रेत्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः या पदार्थांवर उत्पादन दिनांक, एक्सपायरी डेट, घटकांची यादी, अन्नसुरक्षा परवाना क्रमांक किंवा उत्पादक कंपनीचे नाव व पत्ता नमूद नसल्याने आरोग्य आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न

ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्ये आकर्षक पॅकिंगमध्ये हे पदार्थ विकले जातात. मात्र लेबलिंग नियमांचे पालन होत नसल्याचे दिसते. एक्सपायरी डेट नसल्यामुळे हे पदार्थ किती दिवसांपूर्वी तयार झाले, कशा परिस्थितीत साठवले गेले याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे अन्नसुरक्षेबाबत शंका निर्माण होत आहेत.

अनभिज्ञ ग्राहकांचा गैरफायदा

स्वस्त दरात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व इतर नागरिक हे पदार्थ सहजपणे खरेदी करतात. परंतु उत्पादनाची माहिती नसल्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारे अनभिज्ञ ग्राहकांचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे.

आरोग्यावर संभाव्य दुष्परिणाम

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, निकृष्ट दर्जाचा कच्चा माल, अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया किंवा मुदत संपलेले पदार्थ खाल्ल्यास विषबाधा, पोटदुखी, जुलाब, उलटी, अॅलर्जी तसेच यकृत व पचनसंस्थेचे विकार उद्भवू शकतात. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी असे पदार्थ अधिक धोकादायक ठरू शकतात.

प्रशासनाकडून कारवाईची मागणी

फिरत्या विक्रेत्यांची ओळख पडताळणी, अन्नपदार्थांची तपासणी, परवाना नसलेल्या विक्रेत्यांवर कारवाई आणि एक्सपायरी डेट नसलेले पदार्थ जप्त करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. गावोगावी जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे.

परराज्यातील विक्रेत्यांबाबत चर्चा

ग्रामीण भागात फिरणारे विक्रेते परराज्यातील असल्याचे सांगितले जात आहे. ओळखपत्र किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्यामुळे काही ठिकाणी शंका व्यक्त केल्या जात आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित तरुणांची चौकशी करून त्यांच्या विक्रीतील पदार्थांची तपासणी करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एकूणच, ग्रामीण भागात फिरत्या विक्रेत्यांकडून होणाऱ्या बेकरी पदार्थांच्या विक्रीमुळे अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Sellers from other states selling bakery products in ahilyanagar villages

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Bad Quality Food

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!
1

Tukaram Mundhe FDA Action : पनीरने वाजवला बँड… तुकाराम मुंडे ॲक्शन मोडवर! 2 महिन्यांत थेट 165 लायसन्स सस्पेंड!

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड
2

Apollo Hospital FDA Raid : एक्सपायर्ड जेवण देत होतं हॉस्पिटल, बंगळुरुमधील धक्कादायक प्रकार! FDA च्या कारवाईत उघड

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!
3

Best Before Reality : … मग अन्न विषारी होतं? Best Before चा नियम काय सांगतो? FSSAI ने दूर केला मोठा गैरसमज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.