मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणात सचिन वाझे (Sachin Vajhe) या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) एका निर्णयाने मोठा झटका बसला आहे. कारण ईडीने माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे घेतली आहे.
अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने आर्थिक व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अटक करण्यात आले होते. सचिन वाझे हा सीबीआयच्या गुन्ह्यातही माफीचा साक्षीदार बनला होता. मात्र, ईडीच्या गुन्ह्यात तो माफीचा साक्षीदार राहणार नाही. ईडीकडून आता त्याबाबत मान्यता नाही.
पोलीस आयुक्तांकडून आरोप
अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचे गंभीर आरोप
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. परमबीर सिंह यांनी याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन पोलीस महासंचालकांना पत्रही लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
वाझे होता माफीचा साक्षीदार
अनिल देशमुख यांच्या प्रकरणात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला माफीचा साक्षीदार म्हणून परवानगी देण्यात आली होती. मात्र, सचिन वाझे याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) मोठा झटका देत माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली परवानगी मागे घेतली आहे.