Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ईडीने ड्रग्जप्रकरणाची माहिती मागवली; आरोपींची व मालमत्तेची माहिती मागवली

  • By युवराज भगत
Updated On: Mar 05, 2024 | 07:54 PM
Pune Drugs Connection

Pune Drugs Connection

Follow Us
Close
Follow Us:
पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या देशातील सर्वात मोठ्या ड्रग्जप्रकरणाची सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माहिती मागवली आहे. पुणे पोलिसांना तसे पत्र पाठवण्यात आले असून, गुन्ह्याची व यात समावेश असलेल्या आरोपींची आणि त्यांच्या मालमत्तेची पूर्ण माहितीही द्यावी असे म्हंटले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी संबंधित माहिती देण्यात येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ड्रग्ज प्रकरणी अकरा जणांना अटक
पुण्याच्या सोमवार पेठ भागातून उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी वैभव उर्फ पिंट्या माने (वय ४०), अजय करोसिया (३५), हैदर नूर शेख (४०), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६), केमिकल इंजिनिअर युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१), आयुब अकबरशहा मकानदार (वय ४८),  दिल्लीतून संदिप राजपाल कुमार (वय ३९), दिवेष चरणजित भुथानी (वय ३८), संदिप हनुमानसिंग यादव (३२) व देवेंद्र रामफुल यादव (वय ३२) व पश्चिम बंगालमधन सुनिल विरेंद्रनाथ बर्मन (वय ४२) अशा अकरा जणांना अटक केली. तर, मास्टर माईंड संदिप धुणे याच्यासह ६ जण फरार आहेत.
हवालामार्फत पैश्यांची देवाण-घेवाण
पुणे पोलिसांनी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोमवार पेठेत कारवाई केली आणि १७६० किलो मेफेड्रोन पकडले. या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक केली. गुन्ह्याचा तपास मोठा असून, त्याचे कनेक्शन राज्यासह इतर देश आणि परदेशात देखील निघाले आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती आणि गुन्हा संवेदनशील आहे.तर गुन्ह्यात हवाला मार्फत पैश्यांची देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले.
एनसीबीकडूनदेखील या गुन्ह्याची माहिती
गुन्हा मोठा असल्याने तात्काळ यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेमधील एटीएस, एनआयए, एनसीबीकडून देखील या गुन्ह्याची माहिती घेतली होती. त्यानंतर आता ईडीने देखील गुन्ह्याची थोडक्यात माहिती मागवत यातील सर्व आरोपींबाबत माहिती व त्यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागवली आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित आरोपींच्या मालमत्तेबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
साबळे याच्या नावावर संबंधित कंपनी
दरम्यान हैदर शेख, वैभव माने, ड्रग्जच्या कारखाना मालक भिमाजी साबळे आणि केमिकल इंजिनिअर यांची काही माहिती आली आहे. त्यात साबळे याच्या नावावर संबंधित कंपनी आणि पिंपळे सौदागर येथील घर आहे. तर भुजबळ याचे मुंबईत एक घर आहे. इतर माहिती येत असल्याचे माहिती सांगण्यात आले आहे.

Web Title: Ed seeks information on drug case information about accused and property was sought nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2024 | 07:54 PM

Topics:  

  • Enforcement Directorate
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
2

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
4

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.