Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eid Holiday: सोमवारची ‘ईद ए मिलाद’ची शासकीय सुट्टी रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय, मग सुट्टी कधी?

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबर शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारकडून या सुट्टीत बदल करण्यात आता. आता ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरला नसून 'या' दिवशी असणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 14, 2024 | 11:52 AM
सोमवारची 'ईद ए मिलाद'ची शासकीय सुट्टी रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय, मग सुट्टी कधी?

सोमवारची 'ईद ए मिलाद'ची शासकीय सुट्टी रद्द, राज्य सरकारचा मोठा निर्णय, मग सुट्टी कधी?

Follow Us
Follow Us:

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्टयांच्या यादीमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवारी, 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आली. मात्र आता राज्य सरकारकडून सोमवारी 16 सप्टेंबर रोजी मिळणारी ईद-ए-मिलादची (Eid-e-Milad-Un-Nabi 2024) सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लीम धर्मीयांसाठी महत्त्वाचा सण आहे. यादिवशी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा 17 सप्टेंबर मंगळवारी अनंत चतुर्दशी असल्याने रस्त्यांवर मोठी गर्दी जमा होते. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याकरिता या सुट्टीत बदल करण्यात आले आहेत.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला देण्यात येणार आहे. हा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबरला आणि गणपती विसर्जन 17 सप्टेंबरला आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला करावी, अशी मागणी केली होती. याचपार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांनाही ईद-ए-मिलादची सुट्टी 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला असणार आहे.

17 सप्टेंबरला गणेश विसर्जन असल्याने काँग्रेस नेते नसीम खान यांनी यामागचे कारण दिले होते. दोन्ही समाजाचे सण चांगले जावोत आणि परस्पर सौहार्द कायम रहावे. सणाचे पावित्र्य अबाधित रहावे व हिंदू-मुस्लिम बंधुभाव अबाधित रहावा. त्यामुळे 16 सप्टेंबरऐवजी 18 सप्टेंबरला सुट्टी साजरी करावी. नसीम खान यांनी पत्रात लिहिले होते की, आम्ही ‘ऑल इंडिया खिलाफत कमिटी’ची बैठक आयोजित केली होती. प्रेषित मोहम्मद साहिब यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक १६ सप्टेंबरऐवजी १८ सप्टेंबरला काढण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

याचदरम्यान, एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनीही फेसबुकवर एक व्हिडिओ संदेश जारी केला होता की, खिलाफत समितीने आयोजित केलेल्या ईद-ए-मिलाद मिरवणुकीसंदर्भात बैठक झाली होती. उलेमा-ए-इक्रम आणि सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत गणपती विसर्जनही 17 सप्टेंबरला आहे आणि ईद-ए-मिलादही 17 सप्टेंबरला आहे, त्यामुळे आता ईद-ए-मिलादची मिरवणूक निघणार आहे, असा निर्णय घेण्यात आला. 18 सप्टेंबर रोजी काढण्यात येईल. 18 तारखेला सुटी जाहीर करावी आणि मुस्लिमांच्या भावना लक्षात घेऊन एक दिवस दारूबंदी जाहीर करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.

Web Title: Eid holiday government holiday of eid e milad cancelled on monday big decision of the state government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 11:52 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.