Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो, पण….’, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर असं का म्हणाले मुख्यमंत्री?

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसंच महाराजांची 100 वेळा माफी मागण्यात कमीपणा नाही, असं का म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 29, 2024 | 05:52 PM
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर असं का म्हणाले मुख्यमंत्री? (फोटो सौजन्य-X )

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेवर असं का म्हणाले मुख्यमंत्री? (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही फार दुर्देवी आणि मनाला मनाला दु:ख देणारी आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आवाहन करत छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय राजकारणासाठी नसल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. मी त्याच्या चरणी 10 वेळा नाही तर 100 वेळा नतमस्तक होऊन माफी मागेन.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नौदलाचे अधिकारी होती. त्या बैठकीत दोन समित्या केल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटना प्रकरणी चौकशी आणि कारवाई, तसंच दुसरी समिती ज्यामध्ये तज्ज्ञ असतील ज्यांना महाराजांचा पुतळा बनवण्याचा अनुभव आहे. याशिवाय शिल्पकार, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील”. तेथील वारे, पर्यावरण आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराजांचा नवा भक्कम पुतळा बसवला जाईल. विरोधकांनी याचे राजकारण करणे योग्य नाही. कारण मी महाराष्ट्राच्या आराध्य देव महाराजांच्या चरणी एकदा नाही तर 100 वेळा नतमस्तक होण्यास तयार आहे. अजित पवारांनीही माफी मागितली आहे. शिवाजी महाराज हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनीही यावर राजकारण करू नये. नौदलाने अपघातस्थळाची पाहणी केली आहे.

# Live📡| 29-08-2024 📍मुंबई 🎥| पत्रकारांशी संवाद https://t.co/HGjkv8XtQK

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 29, 2024

काल रात्री महत्त्वाची बैठक झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या बैठकीत सिंधुदुर्गात घडलेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरोखरच खूप वेदनादायी घटना आहे. काल झालेल्या बैठकीला सरकारी मंत्र्यांसह नौदल आणि पोलिस अधिकारीही उपस्थित होते. बैठकीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमध्ये नौदल अधिकारी, तज्ज्ञ वास्तुविशारद आणि इतर विषयांतील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती लवकरात लवकर कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

चौकशीसाठी तांत्रिक समिती स्थापन…

कोकण किनारपट्टीवरील मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अभियंते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) तज्ञ आणि नौदल अधिकारी यांचा समावेश असलेली तांत्रिक समिती स्थापन केली आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. बुधवारी रात्री मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भव्य पुतळा तयार करण्यासाठी सरकारने एक समिती देखील स्थापन केली आहे.

Web Title: Eknath shinde appeal to everyone not to do dirty politics of chhatrapati shivaji maharaj statue collapse issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 05:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue

संबंधित बातम्या

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार
1

राजकोटमध्ये पुन्हा उभारण्यात आला छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित अनावरण सोहळा पार

शिवरायांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना; अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर मांडले ठाण
2

शिवरायांच्या पुतळ्याची राहुरीत विटंबना; अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर मांडले ठाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.