मुंबई: विधानसभा निवडणुकीतल दणदणीत विजयानंतर महायुती आता सत्तास्थापनेच्या कामाला लागली आहे. त्या दृष्टीने महायुतीच्या सत्तास्थापनेच्या घडामोडींनाही वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे आज विधानसभेचा कार्यकाल संपत असल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील राजीनामा देणार आहेत.
महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची आज मुदत संपत आहे. त्यामुळे नवे सरकार स्थापन करण्याआधी एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देखील राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर येत्या 2 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला तरी सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील, अशीही माहिती समोर आली आहे.
Todays Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदांती बातमी!
26 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात 14 वी विधानसभा अस्तित्त्वात आली होती. आज या विधानसभेचा कार्यकाळ संपला. पण एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का, असा सवाल उपस्थित होत होता. पण एकनाथ शिंदे नवी विधानसभा अस्तित्त्वात येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूक कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक 132 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मानही मिळवला आहे. त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नव्या मंत्रिमंडळात आपलीही वर्णी लागावी यासाठी युतीतील नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
विधानसभा निवडणूक होताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी
दरम्यान, महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यांभोवतीच चर्चा सुरू आहेत. पण जवळपास मुख्यमंत्रीपद भाजपलाच मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. किमान पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तरी शिंदे यांनाच अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रिपदी ठेवावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. सायंकाळी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आग्रहपूर्वक मागणी केली.
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्रिपद भूषवले आहे आणि ते पुढील कालावधीसाठीही मुख्यमंत्री राहण्यास प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या निर्णयावरुन ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. आता मुख्यमंत्रिपदाबाबत तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. ते मुंबईतच महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील. तसेच तीन पक्षांमध्ये मंत्रीमंडळाच्या जागा वाटपचा फॉर्मुलाही मांडण्याची शक्यता आहे.
चहा की कॉफी? हिवाळ्यात आरोग्यासाठी कोणतं पेय ठरेल गुणकारी, जाणून सविस्तर