Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections: बीडमध्ये शिवसेनेने फुंकले रणशिंग! नगरपरिषदांसाठी आखला मास्टरप्लॅन

Beed Politics: शिवसेना शिंदे गटाने बीडमध्ये मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचा विश्वास अनिल जगताप यांनी व्यक्त केला आहे

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 06:02 PM
Eknath Shinde shivsena masterplan for win nagarparishad beed local body elections 2025

Eknath Shinde shivsena masterplan for win nagarparishad beed local body elections 2025

Follow Us
Close
Follow Us:

Local Body Elections: बीड: राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी मुंबई, पुणे या प्रमुख शहरांसह राज्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी देखील पक्षांनी प्रयत्न सुरु केले आहेत. बीडमध्ये देखील पालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने बीडमध्ये मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्य नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचा विश्वास अनिल जगताप यांनी व्यक्त केला आहे.

बीड नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन यांच्या उपस्थितीत्त शिवसैनिकांनी रणशिंग फुंकले आहे. सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष निवडून आणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करु, असे शिवसेना जिलाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जिल्हा प्रमुख जगताप म्हणाले, की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, मराठवाडा संपर्क मंत्री संजय शिरसाट व मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर यांच्या आदेशानुसार विभागीय सचिव अशोक पटवर्धन आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बीडच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात रणनीती बैठक पार पडली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

सदर बैठकीत शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी विभागनिहाय उमेदवार कसे असावेत, प्रचार कसा करावा, जनसंपर्क अभियान आणि स्थानिक स्तरावरील रणनीतीवर सखोल मार्गदर्शन करून शिवसैनिकांशी मुक्त संवाद साधला. या बैठकीस मोठ्या संख्येने इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष उपस्थित होते. त्यांनी शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार महणून रीतसर अर्ज भरून घेतले. तसेच भावी नगराध्यक्ष पदासाठी बीडमधून तीन सक्षम उमेदवारांची प्राथमिक स्वरूपाची मुलाखत देखील घेण्यात आली. तसेच आम्हाला योग्य युतीमध्ये सन्मान मिळाला तर आम्ही महायुतीमध्ये सहज राहू अन्यथा नगर पालिका निवडणुक आम्ही स्वबळावर लढवू, प्रत्येक प्रभागात आमच्याकडे इच्छुक असणारे सक्षम उमेदवार आहेत तर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडे प्रियंका आकाश बाडमारे, मंदाबाई मारुती जाधव, आणि शितल प्रतिक कांबळे या इच्छुक उमेदवारंची नावे समोर आली आहेत. असे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या बैठकीस जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर, बंद्रकांत नवले, युवसेना जिल्हाप्रमुख रविराज बडे यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बीड नगरपालिकेवर यंदा शिवसेनेचा भगवा फडकवणारच

शिवसेना नगर पालिका निवडूक्किसाठी पूर्णतः सज्ज असून यंदा सर्व सामान्य धरातील नगराध्यक्ष निवडून आणून बीड नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असा ठाम विश्वास शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन आणि जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी व्यक्त केला.

नगराध्यक्षपदासाठी तीन प्रमुख उमेदवार

बीड नगरपरिषद व नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मुख्य रागनीती बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका आकाश वाघमारे मदबाई मारुती जाचद आणि शितल प्रतिक कांबळे असे तीन उमेदवार इच्छुक असल्याची माहिती दिली. तसेच यावेळी सर्व सामान्य घरातला नगराध्यक्ष निवडून आणणार असल्याचा ठाम विश्वास अनिलयदा जगतय यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Eknath shinde shivsena masterplan for win nagarparishad beed local body elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 06:02 PM

Topics:  

  • Beed Politics
  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

मावळची निवडणूक भाजप, राष्ट्रवादीसाठी अवघड? ‘हे’ पाच प्रमुख पक्ष आले एकत्रित; हालचालींना आलावेग
1

मावळची निवडणूक भाजप, राष्ट्रवादीसाठी अवघड? ‘हे’ पाच प्रमुख पक्ष आले एकत्रित; हालचालींना आलावेग

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं
2

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस…”; ‘या’ नेत्याने ‘उबाठा’चं सगळंच बाहेर काढलं

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका
3

‘सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा अन् मनोज जरांगे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी’; प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा
4

‘गडांचे रक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची’; खासदार शाहू महाराजांची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.