महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे (फोटो सौजन्य - istock)
Maharashtra Rain Alert: : मुंबई : राज्याला अवकाळी पावसाने अरक्षशः झोडपून काढले आहे. पूरसृश्य पाऊस झाल्यामुळे फक्त पिके नाही तर जमिनी वाहून गेल्या आहेत. यामध्ये आता हिवाळ्यामध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीनसह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण, पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामेदेखील उप्प झाली आहेत. पुण्यात भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची वाक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी वास्तावला आहे. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. डा कमी दाबाचा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार असून नहाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह नहाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हावामान खात्याने दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल.
सध्या,द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा काळात बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने छाटणीची कामे करणे अवघड झाले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
छाटणीपूर्वीच नाशिकला द्राक्षबागा झाल्या उद्धवस्त
द्राक्षपंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. देशातून निर्यात होणाऱ्या एकूण ३.४३,९८२ टन द्राक्ष निर्यातीपैकी महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के, तर त्यातही नाशिक जिल्ह्याचा वाटा सुमारे ६० टक्के इतका आहे. मागील वर्षी एकट्या नाशिकमधून १.५७ लाख टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली होती. विशेषतः नाशिकच्या मातीतील द्राक्ष आपल्या विशिष्ट गोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख निर्माण करून आहेत. असे असले तरी यंदा ‘द्राक्षपंढरी’ला नैसर्गिक संकटांनी वेढल्याचे चित्र आहे. यंदा मे महिन्यात सुरू झालेला पावसाळा दिवाळी उलटूनही सुरूच आहे. त्यातही सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने द्राक्षबागा अक्षरशः उद्धवस्त झाल्या आहेत.






