Eknath Shinde tiranga rally in Mumbai saluting the soldiers of Operation Sindoor
ठाणे : भारत पाकिस्तान युद्धबंदी लागू झाली आहे. यामुळे सीमा भागांमध्ये सध्या वातावरण शांत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचे शौर्य आणि हिम्मत दाखवून दिली आहे. यामुळे ऑपरेशन सिंदूरची पूर्ण जगामध्ये चर्चा आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील आदमपूर येथे एअरबेसला भेट देखील दिली. यावेळी त्यांनी सैन्याचे मनोबल वाढवले. यानंतर राज्यामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तिरंगा रॅली काढून ऑपरेशन सिंदूरचा विजयोत्सव साजरा केला आहे.
ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे. यावेळी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी तिरंगा रॅली काढली. शासकीय विश्राम गृह येथून ही रॅली सुरू झाली. यावेळी हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय आणि सैन्याच्या नावाचा जयघोष करण्यात आला. तसेच भारतीय सैन्याचे धन्यवाद देखील मानण्यात आले. यावेळी तरुणांमध्ये अनोखा उत्साह दिसून आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिंदे गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतावर डोळे वटारले तर खात्माच केला जाईल. भारताकडे पाकिस्तानने वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी प्रतिक्रिया ठाण्यात तिरंगा रॅलीदरम्यान दिली.
पुढे ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर दहशवाद्याना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. तसेच लष्कराने दिलेल्या प्रतिउत्तरानंतर गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानची काय असवस्था झाली, हे संपूर्ण देशाने पाहिले. पाकिस्तानने आपल्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये, अशाप्रकारेचे शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्याने दाखवले आणि त्यांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उभे राहिले. यामुळेच तिन्ही सैन्य दलाचे अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपनगरीय प्रवाशांचा प्रवास सोपा करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) १४ मे पासून मेट्रो-९ च्या चार स्थानकांमध्ये मेट्रोची चाचणी सुरू करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही चाचणी दहिसर (पूर्व) ते काशी व्हिलेज स्टेशन या ४.९७३ किमी मार्गावर होईल. दहिसर (पूर्व) आणि मीरा भाईंदर दरम्यानच्या १३.५ किमी मार्गावर मेट्रो ९ चे बांधकाम सुरू आहे. संपूर्ण मार्गाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे, ही सेवा दोन टप्प्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. मुंबई मेट्रो-९ कॉरिडॉरच्या संपूर्ण मार्गाचे ८५% पेक्षा जास्त बांधकाम पूर्ण झाले आहे. या मार्गावर एकूण ८ स्थानके आहेत. चार मेट्रो स्थानके चाचणीसाठी तयार आहेत, तर उर्वरित चार मेट्रो स्थानके देखील पुढील काही आठवड्यात चाचणीसाठी तयार होतील