Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय म्हणाले सरनाईक, जाणून घ्या सविस्तर.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 10, 2026 | 05:27 PM
Maharashtra Election : “मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजपा कारणीभूत” ; विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:
  • राजकारणात चाललंय तरी काय?
  • मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर तीव्र प्रतिक्रिया
  • भाजपच्या विकास कामावर प्रताप सरनाईक यांचे गंभीर आरोप
भाईंदर/विजय काते : नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रत्येक पक्षात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर काल म्हणजेच शुक्रवारी मीरा-भाईंदर शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजासाठी स्वतंत्र भवन, पाणीपुरवठा, मेट्रो प्रकल्प, क्लस्टर विकास आणि मेट्रो कारशेड यासंदर्भात भाष्य करत भविष्यात या सर्व बाबींवर सकारात्मक प्रयत्न केले जातील, असं आश्वासन दिलं.

सरनाईकांची मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावर नाराजी

मात्र या सभेनंतर शिंदेसेना नेते व परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. विशेषतः पाणीपुरवठा आणि मेट्रो प्रकल्प रखडण्यामागे भाजप आमदार नरेंद्र मेहता हेच कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

‘तू मारल्यासारखे कर, मी…’! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा

काय म्हणाले प्रताप सरनाईक ?

सरनाईक म्हणाले की, याआधी भवन उभारणीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मेहता यांनी आपल्यावर टीका केली होती. मात्र काल झालेल्या सभेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून समाज भवन उभारण्याची घोषणा केली. यावरून आपण पूर्वी केलेल्या कामाचीच पोचपावती मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. “मुख्यमंत्र्यांनी माझं नाव न घेता व्यासपीठावरून ज्या घोषणा केल्या, त्या माझ्या प्रयत्नांचीच दखल असल्याचे स्पष्ट होते. एवढेच माझ्यासाठी पुरेसे आहे,” असेही सरनाईक यांनी नमूद केले.

मिरा भाईंदरच्या राजकारणात मोठी उलथापालथ

या आरोप-प्रत्यारोपांमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, पाणी आणि मेट्रोसारख्या महत्त्वाच्या विकासकामांवरून सत्ताधारी पक्षांतर्गत संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. ऐन निवडणुकीच्या रणसंग्रामात होणारे आरोप प्रत्यारोपांमुळे मिरा भाईंदरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असल्याचं दिसून येत आहे.

“राज ठाकरे यांच्या कायदेशीर मुसक्या…, श्रीमुखातून माणसाची औलाद “, सदावर्तेंचा राज-उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

Web Title: Mira bhayander pratap sarnaiks serious allegations on bjps development work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Maharashtra Election
  • political news
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित
1

Kolhapur News : जागरूक मतदार लोकशाहीचे शिल्पकार; समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने ‘मतदार जागृती मोहीम’ आयोजित

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब
2

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय
3

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय

नाशिकमध्ये आज होणार ठाकरे बंधूंची पहिली सभा; मनसेसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
4

नाशिकमध्ये आज होणार ठाकरे बंधूंची पहिली सभा; मनसेसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.