Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल

या ऑडिओ क्लिपशी माझा काहीही संबंध नसून ही ऑडिओ क्लिप मॉर्फ करण्यात आली असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी कापुरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2026 | 11:22 AM
Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
Follow Us
Close
Follow Us:
  • शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य
  • कार्यकर्त्याकडून अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत केल्याने शिवीगाळ
  • मी आज पोरं पाठवली तर त्यांची इज्जत काय राहील?
Thane Municpal election  2026: ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांचे आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मीनाक्षी शिंदे यांचे एक कार्यकर्ते मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांना निवडणुकीसाठी मदत करत असल्याने, मीनाक्षी शिंदे यांनी त्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत धमक्या दिल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

Raj Thackeray on Mahayuti: १५०० रुपये १५ दिवसांत संपतात..; राज ठाकरेंची लाडकी महिलांना योजनेवर टिका

मीनाक्षी शिंदेंची व्हायरल ऑडिओ क्लिप नेमकी काय? आरोप, धमक्या आणि मॉर्फ असल्याचा दावा

ठाण्याच्या माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्या मीनाक्षी शिंदे सध्या महापालिका निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रचारादरम्यान त्यांच्या वार्डात वाद निर्माण झाला असून, त्यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये प्रचारासाठी काही कार्यकर्ते उपस्थित नसल्यामुळे मीनाक्षी शिंदे संतप्त झाल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. (Eknath Shinde News)

व्हायरल ऑडिओमध्ये त्या एका कार्यकर्त्याला  सुनावताना दिसतात. “तुमच्यात दम नाही तर काम कशाला करायचं? मी आज पोरं पाठवली तर त्यांची इज्जत काय राहील?” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच “तूही प्रचाराला येत नाहीस. तुमच्या बायका पळवून नेल्या का माझ्या नवऱ्याने म्हणून हे लोक सॅड झाले आहेत?” असे वादग्रस्त विधान केल्याचा आरोप होत आहे. इतकेच नव्हे तर “त्याच्या आई-बहिणीला फोन कर, घरात बायका पाठवून मारायला लावेन,” अशी धमकी दिल्याचेही ऐकू येत असल्याचा दावा आहे.

Thane Municpal News: माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या काय? मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप सोशल

पुढील संभाषणात आनंद भोईर नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत शिवीगाळ, बदनामीकारक आरोप आणि मारहाणीच्या धमक्या दिल्याचेही सांगितले जात आहे. “त्याला रस्त्यावर आणून मारेन, निवडणुकीनंतर बघून घेईन,” तसेच आगरी समाजाविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप या ऑडिओ क्लिपवरून केला जात आहे. शिवाजीनगरमधील घरांपासून पोलीस कारवाईपर्यंत धमकीचे उल्लेख या संभाषणात असल्याचेही व्हायरल क्लिपमध्ये ऐकू येत असल्याचा दावा आहे.

मात्र, या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी नवराष्ट्र (Navarashtra) मराठी करत नाही. दरम्यान, या प्रकरणावर मीनाक्षी शिंदे स्वतः समोर आल्या असून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “ही माझी ऑडिओ क्लिप नाही. एआयच्या माध्यमातून माझ्या नावाने दोन ऑडिओ क्लिप तयार करून त्या व्हायरल करण्यात आल्या आहेत,” असा दावा त्यांनी केला आहे.

विरोधकांकडून जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच हा प्रकार करण्यात आला असून, निवडणुकीत पराभव दिसू लागल्यानेच आपल्याविरोधात हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस तक्रार दाखल केली असून, कायदेशीर मार्गाने सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Thane municipal news did my husband abduct their wives meenakshi shindes audio clip goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी
1

Maharashtra Politics: खुर्चीसाठी काहीपण! महाराष्ट्रात काहीही घडतंय, शिवेसना-NCP सह असदुद्दीन ओवैसी AIMIM हातमिळवणी

Thane Election:  शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
2

Thane Election: शिंदे यांचे जवळचे सहकारी 7 वर्षात मालामाल! ठाण्यातील ‘या’ उमेदवारांची एकूण आकडा वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
3

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Ambarnath News: अंबरनाथमध्ये भाजपच्या कमळावर धनुष्याचा वार; शिंदेंची शिवसेना–राष्ट्रवादी सत्ता स्थापणार
4

Ambarnath News: अंबरनाथमध्ये भाजपच्या कमळावर धनुष्याचा वार; शिंदेंची शिवसेना–राष्ट्रवादी सत्ता स्थापणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.