Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde News: एकनाथ शिंदे ‘धनु्ष्यबाण’ उद्धव ठाकरेंना परत देणार? नेमकं काय आहे कारण?

सुमारे आठवडाभरापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 22, 2024 | 04:06 PM
Eknath Shinde News: एकनाथ शिंदे ‘धनु्ष्यबाण’ उद्धव ठाकरेंना परत देणार? नेमकं काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी  खातेवाटपाच्या नाट्यमय घडामोडींवर  सस्पेंस  संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील बहुप्रतिक्षित विभागांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले.  मंत्रिमंडळ विस्तारानंतर जवळपास आठवडाभर चाललेल्या चढाओढीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री उशिरा खातेवाटपांची घोषणा केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली. पण सर्व प्रयत्न करूनही उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना गृहखाते मिळाले नाही.

नगरविकास खात्यावर समाधान

मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे यांना किमान गृहखाते दिले जाईल, अशी आशा होती. मात्र तसे न झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आणि एकनाथ शिंदे यांना नगरविकास खात्यावर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या यापूर्वीच आल्या आहेत. मात्र, या प्रकरणात ते काहीही करू शकले नाहीत.  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीचा भाजपचा शानदार विजय झाल्यानंतर केवळ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र आता त्यांच्याकडून गृहमंत्रीपदही हिसकावून घेण्यात आले असून, त्यानंतर आता ते शिवसेनेच्या युबीटीकडे परतण्याचा पवित्रा घेऊ शकतात.

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांची रणनीती ठरली? ‘त्या’ बैठकीनंतर घेणार मोठा निर्णय

 उद्धव ठाकरेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न

पण या सर्व घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे  उद्धव ठाकरेंना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.  याची सुरूवात  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा पक्षनिधी उद्धव ठाकरेंना परत देण्याच्या निर्णयापासून  केल्याचे सांगितले जात  आहे.  हा निर्णयाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे. इतकेच नव्हे तर  पक्ष निधीनंतर ते निवडणूक चिन्ह धनुष्यबाण देखील उद्धव ठाकरेंना परत देऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना निवडणूक चिन्ह परत केल्यास महायुतीचे शिवसेनेचे अस्तित्व संपुष्टात येईल आणि एकनाथ शिंदे यांना पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा मार्ग मोकळा होईल. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 2022 पर्यंतचा पक्षाचा निधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला होता.

जेवणात तोंडी लावण्यासाठी ‘या’ पद्धतीने बनवा झटपट शेंगदाण्याची चटणी, भाकरी चपातीसोब

एकनाथ शिंदे यांचा प्रभाव   मर्यादित

खरे तर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्यासह अनेक महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली, तर एकनाथ शिंदे यांना नगरविकास, सार्वजनिक बांधकाम या खात्यांवर समाधान मानावे लागले. शनिवारी फडणवीस सरकारने आपल्या मंत्रिमंडळात खातेवाटप केल्यावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले.

शपथविधी समारंभ

सुमारे आठवडाभरापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नागपुरात पार पडला. यामध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. नागपुरातील 6 दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांच्या खात्यांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Eknath shinde will return the bow and arrow to uddhav thackeray nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार
1

एकनाथ शिंदेंच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला; धारधार शस्त्राने सपासप वार

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ
2

Thane Politics: …तर एकनाथ शिंदेगट-महायुतीत फूट पडणार? ठाण्यात माजी मंत्र्याच्या एंट्रीने शिंदे गटात खळबळ

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय
3

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर, टोलमाफी संदर्भात एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
4

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.