Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”

लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 03, 2026 | 06:39 PM
Maharashtra Politics: कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले, “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”
Follow Us
Follow Us:
  • कोकणाबाबत एकनाथ शिंदेंचे मोठे विधान;
  • “लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी…”
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिकजनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे मोठे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा स्पष्ट इशारा दिल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोकण हे निसर्गसंपन्न आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे.

येथे उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असला पाहिजे. प्रदूषण वाढवणारे प्रकल्प मंजूर करून कोकणच्या आरोग्यावर आणि शेती-मत्स्यव्यवसायावर परिणाम होणार असेल, तर सरकार ते सहन करणार नाही.लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून चिपळूण, खेड, लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू होता. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले होते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या विधानाकडे विशेष महत्त्व दिले जात आहे.

Aahilyanagar Mayoral Election: अहिल्यानगरचे महापौर-उपमहापौर ठरले; भाजपा-राष्ट्रवादी युतीचे शिक्कामोर्तब

कारवाई काय होणार? प्रश्न कायम

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई पुढे या प्रकल्पावर नेमकी काय कारवाई होणार, परवानग्या रद्द होणार का, किंवा शासन स्तरावर कोणते आदेश निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या विधानानंतर प्रत्यक्ष निर्णय आणि कारवाई लवकरात लवकर झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.या वेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजपनेते प्रशांत यादव व पदाधिकारी उपस्थित होते.

कोकणच्या मुळावर उठणारे निसर्गरम्य कोकणाची दशा करणारे प्रकल्प म्हणजे विकास नसून अधोगतीला आमंत्रण देण्यासारखं आहे. गेले कित्येक दिवस कोकणवासियांचा या प्रकल्पाला विरोध ठाम होता. आता जिल्हा परिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे चिपळूणमधील नागरिकांसाठी ही बाब दिलासादायक आहेे.

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Web Title: Eknath shindes big statement about konkan will not allow polluting companies like lakshmi organic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 06:34 PM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.