Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde : “औरंगजेब क्रूर नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमींवर…” ; एकनाथ शिंदें कडाडले

अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 05, 2025 | 07:19 PM
“औरंगजेब क्रूर नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमींवर…” ; एकनाथ शिंदें कडाडले

“औरंगजेब क्रूर नव्हता म्हणणाऱ्या अबू आझमींवर…” ; एकनाथ शिंदें कडाडले

Follow Us
Follow Us:

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत एक विधान केलं आहे. त्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी देशद्रोही असल्याचं म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले अबू आझमी यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक करणं हे महापाप आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिम अशी नव्हती”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

“मी असं मानतो की औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानपर्यंत होती. त्या काळात आपला जीडीपी २४ टक्के एवढा होता. तेव्हा भारताला सोने की चिड़िया म्हटलं जायचं. मग मी याला चुकीचं म्हणू का? तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाची लढाई ही धर्माची होती असं मी मानत नाही”, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

नुकताच छावा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अनन्वित अत्याचार दाखवण्यात आले आहेत. हे अत्याचार औरंगजेबाने केले होते. त्यामुळे औरंगजेबाचा निषेध अनेक चर्चा सत्रांमधून आणि सोशल मीडियातून केला गेला. दरम्यान आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अबू आझमी यांनी औरंगजेब क्रूर शासक नव्हता वगैरे म्हणत त्याचं कौतुक केलं. ज्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदेंनी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या मागणीबाबत आता काय निर्णय घेतला जातो आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अबू आझमी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होते आहे.

Web Title: Eknathn shinde demands apology sp mla abu azmi staitment on aurangzeb marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 09:47 PM

Topics:  

  • Budget Session
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.