Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाब्बास अधिकाऱ्यांनो! “मोदी, शहांची…”; कराड विमानतळावरील प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल

पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भानुप्रताप कदम यांच्या प्रचारसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ठाकरे ही कराड दौऱ्यावर आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 17, 2024 | 05:28 PM
शाब्बास अधिकाऱ्यांनो! "मोदी, शहांची..."; कराड विमानतळावरील प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल

शाब्बास अधिकाऱ्यांनो! "मोदी, शहांची..."; कराड विमानतळावरील प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

कराड: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचारसभा घेऊन महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. २० तारखेला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून बॅग्स तपासणी हा मुद्दा चांगलाच तापला आहे. यवतमाळमधील वणी येथे उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी केल्यानंतर हा मुद्दा तापला. मात्र सध्या ठाकरेंच्या मागचे बॅग्स तपासणीचे सत्र संपताना दिसत नाहीये. कारण कराड विमानतळावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या बॅग्सची तपासणी करण्यात आली आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद उर्फ भानुप्रताप कदम यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बॅगा, साहित्याची रविवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानातील पिशवी उघडून पाहण्यात आली. दरम्यान, नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साहित्याची देखील तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. यावेळी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाहता उद्धव ठाकरे यांनी शाब्बास अधिकाऱ्यांनो… बॅगा तपासताय, मोदी, शहांची बॅग तपासली का? असा सवाल ठाकरे यांनी केला.

माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची रविवारी पाटण येथील मल्हारपेठमध्ये सभा पार पडली. या सभेसाठी ठाकरे सकाळी कराड विमानतळावर आपल्या विमानाने उतरले. ठाकरेंचा दौरा नियोजित असल्यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचे पथक विमानतळावर तळ ठोकून होते. दुपारी विमानाने उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगा तपासल्या. तसेच विमानात जाऊन साहित्याची, पिशव्यांची तपासणी करत असताना अधिकाऱ्यांना त्यात काळ्या रंगाचा गॉगल आढळून आला.

हेही वाचा: काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…! फडणवीस अन् गडकरींची बॅग चेकिंग; विरोधकांना सुनावले खडेबोल

तपासणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या हातातील मोबाइलवरून सर्व घटनेचं व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच अधिकाऱ्यांना त्यांचे नाव व पद देखील विचारले. यावेळी कुणाकुणाच्या बॅगांची तपासणी केलीय? असा सवाल ठाकरेंनी विचारताच अधिकाऱ्यांनी आतापर्यंत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ. विश्वजीत कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बॅगांची तपासणी केल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एक महिना बाकी राहिला आहे. निवडणूक प्रचारातील गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाकडून जागोजागी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. तसेच नेत्यांच्या बॅगची व गाड्यांची तपासणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅगची दोन वेळा तपासणी करण्यात आली. वणी येथे बॅग तपासणी केल्यामुळे उद्धव ठाकरे संतापले होते. त्यानंतर पुन्हा एकदा बॅग तपासणी  केल्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांची उलट तपासणी घेतली. तसेच स्वतः व्हिडिओ काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला देखील लगावला होता. त्याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या देखील बॅगाची तपासणी करण्यात आली. यानंतर आता सत्ताधारी भाजप नेत्यांची देखील तपासणी घेतल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

 

Web Title: Election comission officers check the bags of uddhav thakceray at karad airport for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2024 | 05:28 PM

Topics:  

  • Election Comission
  • Maharashtra Assembly election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
1

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
2

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?
3

Maharashtra Politics: लिटमस टेस्ट! ‘या’ निवडणुकीत ठाकरे बंधूंचे एक पॅनल; युती उद्याच्या निकालावर ठरणार?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?
4

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.