Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेला निवडण्यात आलेले काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नाझिम खान उपस्थित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 22, 2024 | 06:15 PM
Baramati News: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Baramati News: बारामतीत पवार विरुद्ध पवार रंगणार सामना; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

Follow Us
Close
Follow Us:

बारामती: महाराष्ट्र विधानसभेचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्यादरम्यान अनेक मतदारसंघातील लढतीवर राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात सर्वांचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. काका विरुद्ध पुतणे अशी लढत होणार आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी(दि २३) पार पडत आहे. शनिवारी (दि २३)सकाळी ८ वाजता ही मतमोजणी प्रक्रिया बारामती औद्योगिक वसाहत परिसरातील वखार महामंडळ गोडाऊन येथे होणार असून त्याकरिता प्रशासन सज्ज आहे ,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली. येथील व व्यवस्थेचा संपूर्ण आढावा  नावडकर यांनी घेतला.याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले,आज  २३ उमेदवारांकरिता मतमोजणी होणार असून याकरिता ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्त केली आहे.

ईव्हीएम मतमोजणी करिता २० टेबल, पोस्टल बॅलेट मतमोजणी करिता ८ टेबल तर ईटीपीबीएस साठी २ टेबल लावण्यात आले आहे. प्रथम टपाली मतपत्रिका मोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल, तर ८.३० ला ईव्हीएम मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीचे एकूण २० राऊंड होणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत कुठलाही अनुसूचित प्रकार घडु नये, याकरिता चोक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. यामध्ये १ उपविभागीय पोलीस अधिकारी,२पोलीस निरीक्षक ,  १२ पोलीस अधिकारी, ७८ पुरुष पोलीस कर्मचारी ,२६ महिला पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बीएसएफ चे ३ सेक्शन हरियाणा एस आर पी एफ चे ३ सेक्शन तर राज्य एस आर पी एफ १ सेक्शन इत्यादी यंत्रणा तैनात केली आहे.

मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न 

दिनांक २२ रोजी दुपारी ३ वाजता मतमोजणी प्रक्रियेला निवडण्यात आलेले काउंटिंग सुपरवायझर, काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नाझिम खान उपस्थित होते तर निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी प्रशिक्षणाला मार्गदर्शन केले. मतमोजणीच्या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, मोबाईल आणण्याची परवानगी नाही. बाहेर गेले तर पुन्हा प्रवेश मिळणार नाही, इत्यादी सूचना या प्रशिक्षणामध्ये देण्यात आल्या. तसेच टपाली मतमोजणी प्रक्रिया, इव्हीएम मतमोजणी प्रक्रिया, अवैध मतप्रक्रिया ठरण्याची कारणे इत्यादी सर्व विषयांची सखोल माहिती  नावडकर यांनी याप्रसंगी दिली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाईल अशी माहिती  नावडकर यांनी याप्रसंगी दिली.

बारामती विधानसभा मतदार संघाच्या मतदान प्रक्रियेत ७२.२७ टक्के मतदान झाले.वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार? ,उपमुख्यमंत्री अजित पवार आपला अभेद्य गड राखणार की युगेंद्र पवार परिवर्तन करणार याबाबत बारामतीत विविध तर्क-वितर्क काढण्यात येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशात अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानात उतरवल्याने ही लढत मोठी रंगतदार ठरली आहे.

Web Title: Election comission ready for counting at baramati assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 06:13 PM

Topics:  

  • baramati
  • Election Comission
  • Maharashtra Assembly Elecion 2024

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश
2

Ajit Pawar: बारामती शहरात मुख्य ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा; अजित पवारांचे निर्देश

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय
3

Election Commision: ‘बीएलओ’ आणि पर्यवेक्षकांसाठी आनंदाची बातमी! निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ निर्णय

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त
4

Baramati Crime: भीषण अपघातानंतर पोलिसांना जाग; ओव्हरलोड वाहनांवर मोठी कारवाई, १४ वाहने जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.