Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात

Kankvali News: निवडणूक साहित्य ६ फेब्रुवारी रोजी १४ एसटी बसेस आणि १४ जीप गाड्यांच्या माध्यमातून तालुक्यातील मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2026 | 02:40 PM
Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात

Sindhudurg: निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; ८०० कर्मचारी तैनात

Follow Us
Close
Follow Us:

कणकवली तालुक्यात ८०० कर्मचारी तैनात
ईव्हीएम मशिनचे सीलिंग झाले पूर्ण
११८ ईव्हीएम मशीन झाले तयार; २८ मशीन राखीव

कणकवली:  ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कणकवली तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, सुमारे कणकवली तालुक्यात ८०० अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय आवश्यकतेनुसार राखीव कर्मचारीही उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश काटकर आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. ईव्हीएम मशीनचे सिलिंगचे काम पूर्ण झाले असून, निवडणूक कर्मचाऱ्यांची दोन टप्प्यांत प्रशिक्षण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे.

राखीव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण सुमारे ८०० कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी तैनात राहणार आहेत. निवडणूक साहित्य ६ फेब्रुवारी रोजी १४ एसटी बसेस आणि १४ जीप गाड्यांच्या माध्यमातून तालुक्यातील मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी एकूण ११८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ११८ ईव्हीएम मशीन आणि २८ राखीव ईव्हीएम मशीन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीZP Election 2026: पुणे जिल्ह्यात 23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

१७ मतदान केंद्रांवर नाही होणार मतदान
प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी व शिपाई अशी व्यवस्था करण्यात आली असून, सर्व केंद्रांवर मिळून ८०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. यासोबतच १४ झोनल अधिकारी आणि चार राखीव झोनल अधिकारी नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे जानवली जिल्हा परिषद मतदारसंघातील १७ मतदान केंद्रांवर मतदान होणार १० नाही. त्यामुळे सुमारे ११७ कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी वाजल्यापासून निवडणूक साहित्य मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश काटकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसटी बसेस व जीप गाड्यांच्या माध्यमातून मतदान साहित्य व कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविले जाणार आहेत.

23 हजार मनुष्यबळाची नियुक्ती

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्या आहेत. 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

Web Title: Election commission and administration ready to zp and panchayat samiti elections 2026 sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Kankavli
  • Sindhudurg
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव
1

ZP Election 2026: निवडणुक प्रचारतोफा आज थंडावणार! ७ फेब्रुवारीला मतदान; ‘असे’ शोधा मतदार यादीत नाव

Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली
2

Kunkeshwar Temple: कुणकेश्वर यात्रेसाठी दक्षिण कोकणची काशी सजली

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान
3

ZP Election 2026 : निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; कर्जत तालुक्यातील 220 मतदान केंद्रावर होणार मतदान

ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ
4

ZP Election 2026: कळवंडे, सावर्डेत चुरशीच्या लढती; उमेदवारांची धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.