अंबरनाथमध्ये जागेसाठी नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये गुरुवारी 17 जुलै रोजी मतपत्रिकेद्वारे गुप्त मतदान घेण्यात आले होते. शहरात पथविक्रेत्या समितीच्या आठ सदस्य पदांसाठी यंदा प्रथमच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये यामध्ये दोन युनियनच्या सहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर महिलांसाठी राखीव असलेले एका जागेसाठी दोन नामनिर्देशक पत्र दाखल झाल्याने गुरुवारी गुप्त मतदान प्रक्रिया राबवून मतदान घेण्यात आले होते. महिलांसाठी राखीव ठेवलेली जागा यामध्ये ज्योती हुमणे यांना 307 तर जयश्री शिंदे यांना 180 मते मिळाली.
Bharat Gogavale: “… नुकसान टाळण्यासाठी ठोस निर्णय घेणार”; मंत्री भरत गोगावले
फेरीवाला समिती सदस्यांच्या निवडणुकीमध्ये ज्योती हुमणे यांना मुरबाड निवडणूक निर्णय अधिकारी मनोज म्हसे यांनी विजयी घोषित केले. या निवडणुकीमध्ये एकूण 1283 पैकी सहा 560 इतके मतदान झाले. यामध्ये 73 मते ही बाद ठरली. महिलांसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी नामनिर्देशन पत्र न आल्याने जागा रिक्त ठेवण्यात आला होत्या.
यावर्षी पहिल्यांदाच राज्यांच्या कामगारांच्या आदेशानुसार नगरपथ विक्रेता समिती सदस्यांकडून निवडणूक घेण्यात आली. झालेल्या या निवडणूक प्रक्रिया साठी मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज भजे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं. कामगार नेते श्याम गायकवाड यांचे नेतृत्वाखाली लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे तार तर पुरुषोत्तम नल्लासेवी त्यांच्या रिपब्लिक होकर फिल्म यांच्यातील उमेदवार निवडून आले आहेत.
Padalkar-Awhad Clashes: पडळकर-आव्हाड वादाचा परिणाम? नताशा आव्हाडांवर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट
सर्व साधारण प्रवर्ग जगन्नाथ उगले, पुरुषोत्तम नल्ला करपण, महिला राखीव गटामधून माया गायकवाड, इतर मागास प्रवर्ग गटामध्ये मोहन घर, अल्पसंख्यांक प्रवर्ग यामधून शमीम शेख, विकलांग आणि दिव्यांग प्रवर्ग या गटामध्ये शंकर दोडके या सहा जागा बिनविरोध झाल्या. फेरीवाल्यांना परवाने मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न असतील. नगरपालिकेने फेरीवाला झोनची निर्मिती करावी त्याचबरोबर नगरपालिकेने स्थायी आणि अस्थायी फेरीवाल्यांना संरक्षण मिळवून द्यावे. त्याचबरोबर फेरीवाल्यांचे होणाऱ्या थांबवण्यात याव्या अशा मागण्या फेरीवाल्याने केल्या आहेत.