Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Electric Bus: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आता इलेक्ट्रिक बस! ‘बेस्ट’ च्या ताफ्यात ४ नवीन ई-बसेस दाखल

मुंबईच्या रस्त्यांवर आता इलेक्ट्रिक बस धावणार! बेस्ट (BEST) आणि पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने ४ नवीन ई-बसचे लोकार्पण केले आहे. वाचा या नवीन बसची वैशिष्ट्ये, योजना आणि मुंबईला कसा फायदा होईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 06:01 PM
Mumbai Electric Bus: मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आता इलेक्ट्रिक बस! ‘बेस्ट’ च्या ताफ्यात ४ नवीन ई-बसेस दाखल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: हरित गतिशीलतेकडे वाटचाल करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलत पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या मुंबादेवी मोबिलिटीने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट)च्या सहकार्याने मुंबईसाठी इलेक्ट्रिक बसच्या पहिल्या तुकडीचे लोकार्पण केले. या उपक्रमामुळे मुंबई शाश्वत, स्वच्छ आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे कोलाबा येथील बेस्ट कार्यालयात आयोजित अधिकृत समारंभात १२ मीटर लांबीच्या ४ संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस श्री. आशिष शर्मा, महाव्यवस्थापक, बेस्ट यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.”

मुंबईत २५० इलेक्ट्रिक बस सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा प्रारंभ असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. ओशिवरा डेपोमधून या बस कार्यरत राहतील, ज्याची निवड प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांना सेवा पुरविण्यासाठी रणनीतीपूर्वक करण्यात आली आहे.

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने डिझाइन व निर्मिती केलेल्या नव्या १२ मीटर लांबीच्या बस प्रवाशांच्या सोयीसह शाश्वततेचे उत्कृष्ट संयोजन सादर करतात. प्रत्येक बसमध्ये चालकासह ३६ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून, व्हीलचेअर प्रवेशाची सुविधा तसेच अधिक लवचिकतेसाठी ३ फोल्डेबल (घडीच्या) आसनांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४०० मिमी उंचीच्या लो-फ्लोअर डिझाइनमुळे बसमध्ये चढणे-उतरणे अधिक सुलभ झाले असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर व सर्वसमावेशक ठरतो. ३६६.६६ केडब्ल्यूएच क्षमतेच्या एलएफपी बॅटरीसह सुसज्ज या बस एका चार्जवर २५० किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात, ज्यामुळे त्या मुंबईच्या दैनंदिन शहरी मार्गांसाठी आदर्श ठरतात. पीएमएसएम मोटर प्रणाली प्रवासाला अधिक सुरळीत आणि कार्यक्षम बनवते, तर बसमधील अत्याधुनिक सुलभता सुविधा प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी अनुभव देतात

हे देखील वाचा: Mumbai AC Vande Metro: मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार! एसी वंदे मेट्रो लवकरच रुळांवर धावणार

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीच्या सीईओ डॉ. आंचल जैन म्हणाल्या, “मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या प्रगत आणि दूरदृष्टीपूर्ण ध्येयात भागीदार होण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही बेस्टचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. या लोकार्पणातून शाश्वत गतिशीलतेप्रती शहराची ठाम वचनबद्धता अधोरेखित होते. या प्रवासात आपला सहभाग नोंदविण्याचा आम्हाला अभिमान असून, आगामी काळात मुंबईच्या हरित आणि स्वच्छ भविष्यासाठी सातत्याने योगदान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. नियोजित वेळेआधी बसेस सुपूर्द करणे म्हणजे प्रशासन आणि उद्योग हातात हात घालून काम केल्यास काय साध्य करता येते याचे उत्तम उदाहरण आहे. आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत आणि भारताच्या शाश्वत व भविष्योन्मुख सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासात साथ देण्यास कटिबद्ध आहोत.”

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी आज भारतातील शाश्वत सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करत आहे. सध्या कंपनीची उपस्थिती देशातील ३१ शहरांमध्ये असून, २,७०० हून अधिक ई-बस विविध महत्त्वपूर्ण प्रदेशांमध्ये यशस्वीरीत्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर भारतातील लडाख, हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशपासून, पूर्वेकडील पश्चिम बंगाल व ओडिशा, दक्षिणेतील केरळ आणि पश्चिमेकडील गुजरात, महाराष्ट्र व गोवा या राज्यांपर्यंत कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. या विस्तारामुळे देशभर शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे

Web Title: Electric buses will now run on mumbais roads 4 new e buses join best fleet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 06:01 PM

Topics:  

  • bus
  • Mumbai

संबंधित बातम्या

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट! भाविकांचे १०० मोबाईल आणि सोन्याच्या चेन लंपास
1

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट! भाविकांचे १०० मोबाईल आणि सोन्याच्या चेन लंपास

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर संपन्न; तब्बल ३३ तासांनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप
2

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर संपन्न; तब्बल ३३ तासांनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
3

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Lalbaugcha Raja Visarjan 2025 Live: अखेर लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ‘इथे’ क्लिक करुन घ्या शेवटच दर्शन
4

Lalbaugcha Raja Visarjan 2025 Live: अखेर लालबागच्या राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ‘इथे’ क्लिक करुन घ्या शेवटच दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.