Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: राक्षस की बाप? पोटच्या मुलीवर बलात्कार, ५ महिन्यांची गर्भवती, डीएनए तपासणीत धक्कादायक उलगडा

दक्षिण मुंबईतील कफ परेडमध्ये मानसिकदृष्ट्या दिव्यांग 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरण उघड झाले. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले असून डीएनए तपासणीत वडिलांचाच संबंध स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 01:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कफ परेडमध्ये दिव्यांग तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघड.
  • पीडिता पाच महिन्यांची गर्भवती; डीएनए अहवालात वडिलांचा संबंध स्पष्ट.
  • पोलिसांकडून आरोपी वडिलांना अटक; पुढील तपास सुरू.
मुंबई: दक्षिण मुंबईतून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका २० वर्षीय दिव्यांग तरुणीसोबत तिच्या ५० वर्षीय वडिलांनी घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कफ परेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकरणातील पीडिता ही ती मानसिकदृष्ट्या विकलांग असून तिला बोलता किंवा ऐकता येत नाही. एवढेच नाही तर ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं उघडकीस आलं. डीएनए चाचणीच्या रिपोर्ट्सनंतर, या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला. काय उलगडा झाला? नेमकं काय घडलं तिच्या सोबत? जाणून घ्या.

दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता

कशी आली माहिती समोर?

पीडितेने हातवारे करून पोटात विचित्र वेदना होता असल्याचे तिच्या आजीला सांगितलं होत. त्यानंतर, कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णलयात नेलं आणि मेडिकल टेस्टनंतर डॉक्टरांनी पीडित ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. ही धक्कादायक बाब समजताच रुग्णालयाच्या प्रशासनाने तात्काळ कफ परेड पोलिसांना याची माहिती दिली.

वडिलांनी काय सांगितलं?

पीडिता तिच्या अपंगत्वामुळे स्पष्ट जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. दरम्यान, तिच्या वडिलांनी सांगितलं की त्यांची मुलगी लहानपणापासूनच मानसिकदृष्ट्या अपंग आहे आणि तिच्यासोबत कोणत्याही प्रकरचा लैंगिक अत्याचार झाला नाही. तसेच, त्यांचं कुटुंब सुद्धा याबाबत कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचं देखील ते म्हणाले. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरूच ठेवला आणि पीडितेच्या काउन्सलिंगमध्ये तिने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी संमती दिली.

कसा केला तपास

पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) च्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंग तरुणीचं लैंगिक शोषण तसेच, जबाब देण्यास असमर्थ असलेल्या मुलीवर बलात्कार यासंबंधी कलमांचा समावेश होता. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मार्च ते 21 सप्टेंबर 2025 दरम्यान ही घटना घडली आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी या प्रकरणाचा एफआयआर दाखल करण्यात आला.

पोलिसांनी संशयितांच्या ओळखीच्या आधारे 17 हून अधिक लोकांचे रक्ताचे नमुने घेतले. त्यानंतर ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. गर्भाचं सॅम्पल देखील डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आलं. 27 जानेवारी 2026 रोजी, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात संबंधित गर्भाचा डीएनए पीडितेच्या वडिलांशी मॅच झाला. डीएनए रिपोर्ट्सच्या आधारे, पोलिसांनी मुलीच्या वडिलांची चौकशी केली त्यांनतर मुलीच्या वडिलांना अटक केली. या प्रकरणाचा तपास करत आहे.

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात.

  • Que: प्रकरण कसे उघड झाले?

    Ans: तरुणीला पोटदुखी झाल्यानंतर तपासणीमध्ये ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: डीएनए अहवालानंतर आरोपी वडिलांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Mumbai news a monster or a father rape of his own daughter who is five months pregnant a shocking revelation in the dna test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Yavatmal Crime: यवतमाळात बेपत्ता 6 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह पोत्यात सापडला; गावात संतापाची लाट
1

Yavatmal Crime: यवतमाळात बेपत्ता 6 वर्षीय चिमुरडीचा मृतदेह पोत्यात सापडला; गावात संतापाची लाट

Akola Crime: अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यात आढळला; शहरात खळबळ, तपास सुरू
2

Akola Crime: अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यात आढळला; शहरात खळबळ, तपास सुरू

Hyderabad Crime: मांजरीवरून वाद आणि थेट आत्महत्या; हैद्राबादमध्ये 23 वर्षीय MBBS डॉक्टरने संपवले जीवन
3

Hyderabad Crime: मांजरीवरून वाद आणि थेट आत्महत्या; हैद्राबादमध्ये 23 वर्षीय MBBS डॉक्टरने संपवले जीवन

Belgaum: बेळगावात कमांडो प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी घटना; स्विमिंग पूलमध्ये लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
4

Belgaum: बेळगावात कमांडो प्रशिक्षणादरम्यान दुर्दैवी घटना; स्विमिंग पूलमध्ये लष्करी अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.