Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्…

दुशिंगपूर शिवारात पाझर तलावाजवळील पूल ओलांडल्यानंतर अचानक कारच्या बोनेटमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घुगे यांनी तातडीने कार थांबवून बाहेर पडताच आगीचा भडका उडाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 28, 2026 | 02:58 PM
समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्...

समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक कार पेटली; धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर आले अन्...

Follow Us
Follow Us:

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दुशिंगपूर शिवारात भरधाव इलेक्ट्रिक कारने दुपारी पेट घेतला. धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बाहेर उडी घेतली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढा घातला. त्यात कार पूर्णपणे जळून जळून खाक झाली होती.

सिन्नर येथील व्यावसायिक योगेश घुगे हे त्यांच्या टाटा नेक्सन इलेक्ट्रिक कारमधून (एमएच १५ एचवाय ५५६३) समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे जात होते. वावी पोलीस ठाणे हद्दीतील दुशिंगपूर शिवारात पाझर तलावाजवळील पूल ओलांडल्यानंतर अचानक कारच्या बोनेटमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून घुगे यांनी तातडीने कार थांबवून बाहेर पडताच आगीचा भडका उडाला. कार पेटल्यानंतर मदतीसाठी घुगे यांनी वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणतेही वाहन थांबले नाही.

समृद्धीवरील आपात्कालीन मदतीचा क्रमांकही तत्काळ उपलब्ध न झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. अखेर घुगे यांनी सिन्नरमधील मित्रांशी संपर्क साधून टोल फ्री क्रमांक मिळवला. त्यानंतर गोंदे टोल प्लाझावरील आपात्कालीन पथक घटनास्थळी रवाना झाले. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल गोडे आणि विक्रम टिळे मदतीसाठी रवाना झाले.

दीड किलोमीटर जावे लागले पायी

दुशिंगपूर शिवारातील ठिकाणी थेट प्रवेशमार्ग नसल्याने त्यांनी पाझर तलाव परिसरातून शॉर्टकट घेतला. वाहन खाली उभे करून या कर्मचाऱ्यांना तब्बल दीड किलोमीटर अंतर पायी चालत घटनास्थळी जावे लागले.

अचानक लागलेल्या आगीत गाडी जळून खाक

दुसऱ्या एका घटनेत, पनवेल ओएनजीसी (Panvel ONGC) आणि भिंगारी गावाजवळ (Bhigari Village) असलेल्या सीएनजी पंपाजवळ (CNG Pump) थरार उडवणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. पनवेल ओएनजीसी आणि भिंगारी गावाजवळील सीएनजी पंपाजवळ उभ्या असलेल्या एका झायलो गाडीने (Xylo Car) अचानक पेट घेतला. ही घटना घडताच परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, अचानक झायलो गाडीने पेट घेतल्यामुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या गाड्या लगेच बाजूला घेण्यात आल्या होत्या. तसेच झायलो गाडीला आग लागताच जवळील व्यक्तींनी अग्निशमन दलाच्या जवानांना कळवले.

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू

Web Title: Electric car catches fire on samruddhi expressway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • electric car

संबंधित बातम्या

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला  3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर
1

पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दरांमुळे की… देशात EV चा क्रेझ वाढतोय? Tata Moters ला 3400 हून अधिक गाड्यांची ऑर्डर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.