कल्याण : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजने अंतर्गत महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना “नारी शक्ती दूत” या ॲपद्वारे अर्ज भरावयाचा आहे. हे अर्ज भरण्यासाठी ३६६ मतदान केंद्र उभारली जाणार असून, त्यापैकी १९० मदत केंद्रे स्थापन झाली आहेत. २८ आरोग्य केंद्रातही मतदकक्ष उभारण्यात आले असून, २७७ अंगणवाड्यामधूनही लाभार्थी महिलांना अर्ज भरण्यास सहाय्य केले जात आहे. या योजनेस महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यासाठी प्रभागस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर ३ शासकिय सदस्य आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शासकीय सदस्य राहणार आहेत. या प्रभागस्तरीय समितीमार्फत अर्जांची छाननी करुन पात्र महिलांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी १९ जुलै रोजी झालेल्या झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सदर योजनेची मुदत दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून महापालिका क्षेत्रातील पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा आवर्जुन लाभ घ्यावा, असेही आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी यावेळी केले.
आगामी निवडणूकांपूर्वी इलेक्ट्रोरोल इंन्डेक्स तयार करण्यासाठी माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयास भेट देऊन महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा केली. Free आणि Fare निवडणूका होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांचे समवेत आढावा बैठकीचे आयोजन माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
Freedom, Fairness, transparency या सूत्रांवर निवडणूक होण्यासाठी नागरीकांचे, नगरसेवकांचे Perception घेतले जाईल, अशी माहिती माजी निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांनी दिल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.
रेल्वे स्थानक परिसरात होणा-या वाहतुक कोंडीबाबत वाहतुक पोलीस, आरटीओचे अधिकारी यांनी वाहतुकीचे नियोजन करावे, जेणेकरुन वाहतुक कोंडीवर नियंत्रण येईल. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवरही महापालिका व पोलीस यांचेमार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून वाहतुक विभागाला जड वाहनांसाठी या सप्ताहामध्ये नोटीफिकेशन काढून अंमलबजावणी करणेबाबत सांगितले असल्याची माहिती देखील महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली.