
या हवा प्रदूषणात दिल्लीमधील हवेची गुणवत्ता जी नेहमी ३०० एक्यूआयच्या पुढे असते ती कमी असल्याचे दिसत आहे मात्र असे असताना सध्या मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले आहे. शुक्रवारच्या ‘सफर’ या संस्थेच्या अहवालानुसार समोर आले आहे मुंबईचे एक्यूआय ३०९ आणि दिल्लीचे एक्यूआय २४९ असल्याची नोंद झाली.
गेल्या आठवड्यापासून सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अॅण्ड वेदर फोरकास्टींग अॅण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील अहवालानुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून बहुतांश केंद्रावरील प्रती घनमीटर मध्ये अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण (पी.एम. २.५) ३०० पेक्षाही अधिक असल्याची नोंद झाली आहे. यामध्ये माझगाव येथे हवेचा दर्जा सर्वात खालावलेला असल्याचे नोंदवण्यात आले. तसेच, चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, कुलाबा, मालाडमधील एक्यूआय ‘अत्यंत वाईट’ पातळीवर असल्याची नोंद झाली आहे.
शुक्रवारी नोंद करण्यात आलेली हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय)