Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी! विभागांनी समन्वयाने काम करण्यावर दिला भर

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी रब्बी हंगामात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी काटेकोरपणे वापरण्याचे निर्देश देत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यावर भर दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 19, 2025 | 03:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक
  • स्वतंत्र समन्वय समिती गठित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला
  • शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन
रब्बी हंगामातील सिंचन नियोजन प्रभावीपणे राबवून उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी वापरला जावा, असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. हवामानातील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे व्यवस्थापन, सिंचनाची आखणी आणि पिकांच्या नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रब्बी हंगाम २०२५-२६ साठी जिल्हा प्रशासनाकडून सिंचन नियोजन व पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी त्यांनी माती परीक्षण, जमिनीची प्रतवारी, पिकांचा कल जाणून घेणे आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. १५ ऑक्टोबरपासून १५ तारखेपर्यंत होणाऱ्या आवर्तनपूर्व कामांमध्ये कोणतीही तूट राहू नये यासाठी जलसंपदा आणि कृषी विभागांनी एकत्रित समन्वय साधावा, तसेच यासाठी स्वतंत्र समन्वय समिती गठित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. (Buldhana News)

Satara News : महाबळेश्वर नगरपालिकेत होणार तिरंगी लढत; मेढ्यात भाजपाला सेना, शरद पवार गटाचे आव्हान

सिंचन यंत्रणांची दुरुस्ती व देखभाल, पिकांचे परिभ्रमण, दुहंगामी व उन्हाळी पिकांची तयारी, तसेच उपलब्ध पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी आवर्तन सुरू झाल्यानंतर पिकांचे व्यवस्थापन, खतांचा योग्य वापर, रोगराई नियंत्रण आणि आवश्‍यक तांत्रिक मदत तातडीने उपलब्ध करण्यासाठी विभागांनी सज्ज राहण्याचे आदेश दिले. अतिवृष्टी, अल्पवृष्टी किंवा हवामानातील बदल यांचा परिणाम सर्वाधिक शेतीवर होत असल्याने पाण्याचे सुयोग्य नियोजन आणि वेळेवर दिलेले मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीस जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र जाधव, कारंजा येथील कार्यकारी अभियंता जेवळीकर, उपकार्यकारी अभियंता निखील चव्हाण, उपविभागीय अधिकारी नमन डाखोडे, सहाय्यक अभियंता भास्कर वळवी, कृषी उपसंचालक हिना शेख, मुख्यमंत्री फेलो संकेत नरूटे, तसेच कनिष्ठ अभियंता अश्विनी राठोड आदी अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित विभागांनी आपापल्या प्राथमिक तयारीचा आढावा सादर केला असून, आगामी काळातील कृषीविषयक नियोजनावरही चर्चा झाली. रब्बी हंगामात पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास उत्पादन घटण्याचा धोका वाढतो, त्यामुळे तांत्रिक मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना वेळेवर माहितीपुरवठा या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Chandrapur News: ‘स्थानिक ‘मध्ये आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला, महायुती आणि महाविकासमध्ये बंडखोरी संकेत

शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासन, जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि अन्य यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास रब्बी हंगाम अधिक फलदायी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच, उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब आणि शेतकऱ्यांच्या सहभागातून पाण्याचे संवर्धन यासारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच, सर्व यंत्रणांचा समन्वय आणि शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद ठेवल्यास रब्बी हंगामाची उत्पादकता वाढेल आणि जिल्ह्यातील कृषी व्यवस्था अधिक सक्षम बनेल, असा आशावाद बैठकीतून व्यक्त झाला.

Web Title: Every drop of water is for the benefit of farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Buldhana

संबंधित बातम्या

Buldhana News: खामगाव परिसरात बिबट्यांची दहशत! शेती कामाचा खोळंबा त्यात शेतकऱ्याचे नुकसान
1

Buldhana News: खामगाव परिसरात बिबट्यांची दहशत! शेती कामाचा खोळंबा त्यात शेतकऱ्याचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.