पाचगणी नगरपालिका ही आधी अपक्षांचा विजय नंतर पालिकेत आघाडी अशा समीकरणाची नगरपालिका आहे. येथील लक्ष्मीताई कन्हाडकर यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीने शिवसेना थाना सोबत घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाला आव्हान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भाजपाने चार जागांवर तर बारा जागांवर कन्हाडकर गटांने उमेदवारी अर्ज भरले आहेत. नगराध्यक्ष .पदासाठी क-हाड़कर गटाचा अजेंडा अद्याप गुलदस्त्यात आहे.
मेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपाचे स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना व शरद पवार गटाचे एकत्रित आव्हान उभे करण्यात आले आहे. भाजपाने रूपाली वारागडे याना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली आहे, तर शिवसेनेच्या वतीने रेश्मा करंजेकर व शरद पवार गटाच्या सुनीता पार्ट यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. एका उमेदवाराचा अर्ज माघारी घेतला जाण्याची शक्यता आहे.
रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार होती, मात्र अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीला शिवसेनेचे वासुदेव माने यांनी पाठिबा दिला. त्यामुळे येथील लढत राष्ट्रवादी शिवसेना विरुद्ध भाजपाशी होणार आहे. राष्ट्रवादीकडून सुनील माने यांच्या पत्नी नंदना माने यांना तर भाजपाने निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने यांना उमेदवारी दिली आहे.
Ans: भाजपाने फक्त ४ जागांवर उमेदवार दिले आहेत. स्थानिक आघाड्यांमुळे भाजपाने कमी ताकद लावली आहे.
Ans: येथे आधी अपक्षांचे वर्चस्व असणारी सत्ता होती. आता भाजप + शिवसेना (शिंदे) + कन्हाडकर गट अशी मजबूत आघाडी राष्ट्रवादी (अजित पवार) गटाविरुद्ध उभी राहिली आहे.
Ans: राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष सुनील माने अजित पवार गटात गेले. शिवसेनेचे वासुदेव माने यांनी अचानक राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता लढत: राष्ट्रवादी + शिवसेना विरुद्ध भाजप अशी झाली आहे.






